मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पुन्हा एकदा ०.२५ टक्क्यांनी कपात केली असून, वर्षभरातील ही चौथी कपात आहे. यामुळे गृह आणि वाहन कर्जाचे ईएमआय कमी होणार असून, कर्ज आणखी स्वस्त होणार आहेत. एफडीवरील व्याजदर वाढणार असल्याने बँक ग्राहकांना मोठी फायदा होणार असल्याचे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी सांगितले.
रेपो दरात केलेल्या कपातीचा संपूर्ण फायदा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मिळावा, यावर आता आरबीआय लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ठेवीदारांना फायदा कसा?
यावर्षी आरबीआयने एकूण १.२५ टक्क्यांची प्रमुख व्याजदर कपात केली आहे. महागाई कमी असल्याने ठेवीदारांना अधिक फायदा होणार आहे. भलेही व्याजदर थोडा कमी दिसत असेल, तरी महागाईच्या तुलनेत हा दर उंच आहे, असे ते म्हणाले.
कर्जवाढ नियंत्रणातच राहील
रेपो दरात कपात केल्याने कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढेल, मात्र या वाढीमुळे जीडीपी वाढ दुप्पट होईल अशी आरबीआयला अपेक्षा नाही.
२०११-१२ आर्थिक वर्षाच्या आधी ही परिस्थिती होती, जेव्हा सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणात बुडीत कर्जे जमा झाली होती.
सप्टेंबर तिमाहीत वैयक्तिक कर्जांसह क्रेडिट कार्ड कर्ज व इतर असुरक्षित कर्जांमध्ये एनपीए ०.०८%ने वाढला आहे.
