Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विद्युत पंप जप्त-महत्त्वाची बातमी

विद्युत पंप जप्त-महत्त्वाची बातमी

शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पातील ११ विद्युत पंप जप्त

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:09+5:302016-03-03T01:57:09+5:30

शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पातील ११ विद्युत पंप जप्त

Electric pump seized-important news | विद्युत पंप जप्त-महत्त्वाची बातमी

विद्युत पंप जप्त-महत्त्वाची बातमी

वना-टाकळी मध्यम प्रकल्पातील ११ विद्युत पंप जप्त
कन्नड : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धरणांमधील ४० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आलेला असताना शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पात सुरू असलेले विद्युत पंप प्रशासनाने जप्त केले़
खारी-खामगाव बृहत तलावातील २४ विद्युत पंप जप्त केल्यानंतर प्रशासनाने शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पात कारवाई केली़ मंडळ अधिकारी बी. एस. पठाण, तलाठी कल्पना डिघोळे, घटे, पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता भामरे व देवगाव पोलीस यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
---------------
विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
अजिंठा : पाण्याची पातळी पाहत असताना पन्नास फूट विहिरीत तोल जाऊन कोसळल्याने अंभई, ता़ सिल्लोड येथे महिलेचा मृत्यू झाला़ ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
सविता भिका पांडव (२१) रा. जाधववाडी असे या महिलेचे नाव आहे़ अंभई शिवार गट ९८ मध्ये त्यांची विहीर आहे. मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ती विहिरीत पाण्याची पातळी किती आहे हे पाहत असताना पाय घसरून पडली. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर पायघन यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुभाष नवसारे, व्ही. मधे, वंगळ हे करीत आहेत.

Web Title: Electric pump seized-important news