Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५ लाख गुंतवून १ लाख  रुपये महिन्याला मिळवा! कसे स्टेप-बाय-स्टेप जाणून घ्या...

५ लाख गुंतवून १ लाख  रुपये महिन्याला मिळवा! कसे स्टेप-बाय-स्टेप जाणून घ्या...

निवृत्तीनंतर पगार बंद झाला तरी खर्च थांबत नाहीत. अशा वेळी आर्थिक सुरक्षिततेसाठी केवळ पैसे वाचवणे पुरेसे नसून, संपत्तीचा आधार (असेट बेस) तयार करणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:52 IST2026-03-09T11:52:23+5:302026-03-09T11:52:53+5:30

निवृत्तीनंतर पगार बंद झाला तरी खर्च थांबत नाहीत. अशा वेळी आर्थिक सुरक्षिततेसाठी केवळ पैसे वाचवणे पुरेसे नसून, संपत्तीचा आधार (असेट बेस) तयार करणे आवश्यक आहे.

Earn Rs. 1 lakh per month by investing Rs. 5 lakh! Learn how step-by-step... | ५ लाख गुंतवून १ लाख  रुपये महिन्याला मिळवा! कसे स्टेप-बाय-स्टेप जाणून घ्या...

AI Generated Image

निवृत्तीनंतर पगार बंद झाला तरी खर्च थांबत नाहीत. अशा वेळी आर्थिक सुरक्षिततेसाठी केवळ पैसे वाचवणे पुरेसे नसून, संपत्तीचा आधार (असेट बेस) तयार करणे आवश्यक आहे. 'एसआयपी' आणि 'एसडब्ल्यूपी' या जोडगोळीचा वापर करून अवघ्या ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून निवृत्तीनंतर दरमहा १ लाख रुपये पेन्शन मिळवणे आता शक्य आहे.

३० वर्षांच्या गुंतवणुकीचे गणित : तरुण वयात केलेली गुंतवणूक भविष्यात कशी वटवृक्ष बनते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे आर्थिक नियोजन होय. यात तुमचे वय ३० वर्षे आहे आणि तुम्ही ६० व्या वर्षी निवृत्त होणार आहात असे समजू.

पुढच्या पिढीसाठी करा मोठी तरतूद

या नियोजनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, २५ वर्षांत एकूण ३ कोटी रुपये काढून घेतल्यानंतरही, शेवटी तुमच्याकडे सुमारे १ कोटी १८ लाख रुपयांची रक्कम शिल्लक राहते. ती तुम्ही पुढच्या पिढीसाठी सोडून जाऊ शकता. लवकर गुंतवणूक सुरू केल्यास 'कंपाउंडिंग'चा (चक्रवाढ व्याजाचा) मोठा फायदा मिळतो आणि महागाईवर मात करणे सहज शक्य होते.

नियोजनाचे मॉडेल असे करा

तपशील                                आकडेवारी
एकरकमी गुंतवणूक               ५,००,००० रु.
गुंतवणुकीचा कालावधी         ३० वर्षे
जमा झालेला निधी                १.४९ कोटी रु.
निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन         १ लाख रु

टप्पा १ 

कॉर्पसची निर्मिती     ५ लाख रुपये  
एकरकमी गुंतवणूक     ५,००,०००
गुंतवणूक कालावधी     ३० वर्षे
अंदाजे रिटर्न्स     १२% सीएजीआर
एकूण कॉपर्स     १,४९,७९,९६१

टप्पा २ कोणता?  

सुरक्षित पुनर्गुंतवणूक : निवृत्तीनंतर हा जमा झालेला निधी 'कंझर्व्हेटिव्ह हायब्रीड फंड'मध्ये गुंतवावा. यात ८०% हिस्सा डेब्ट आणि २०% इक्विटीमध्ये असल्याने जोखीम कमी होते आणि ८ ते १०% परतावा अपेक्षित असतो.

टप्पा ३ काय?    

'एसडब्ल्यूपी'तून उत्पन्न : या निधीतून दरमहा १ लाख रुपयांची 'सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन' (एसडब्ल्यूपी) सुरू केल्यास, पुढील २५ वर्षे नियमित उत्पन्न मिळत राहते.

गुंतवलेली रक्कम     १,४९,७९,९६१ रु.
मासिक पैसे काढणे     १,००,०००
अंदाजे रिटर्न्स     ८%
पैसे काढण्याचा कालावधी     २५ वर्षे
एकूण पैसे काढले     ३,००,००,०००
बचत रक्कम     १,१८,००,००० 

Web Title : 5 लाख रुपये निवेश करें, हर महीने 1 लाख रुपये कमाएं: चरण-दर-चरण गाइड

Web Summary : एसआईपी और एसडब्ल्यूपी के साथ सुरक्षित सेवानिवृत्ति: ₹5 लाख निवेश करें, संभावित रूप से हर महीने ₹1 लाख पेंशन कमाएं। 25 वर्षों में ₹3 करोड़ की निकासी के बाद, भविष्य की पीढ़ियों के लिए ₹1.18 करोड़ शेष हैं। चक्रवृद्धि का लाभ उठाने के लिए जल्दी शुरुआत करें।

Web Title : Invest ₹5 Lakh, Earn ₹1 Lakh Monthly: Step-by-Step Guide

Web Summary : Secure retirement with SIP & SWP: Invest ₹5 lakh, potentially earn ₹1 lakh monthly pension. After 25 years of withdrawals totaling ₹3 crore, ₹1.18 crore remains for future generations. Start early to leverage compounding.