Lokmat Money > बिझनेस न्यूज > कुटुंबाला मिळते २ लाखांची मदत.. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे 'हे' आहेत फायदे; डिलिव्हरी बॉयला मिळेल लाभ

कुटुंबाला मिळते २ लाखांची मदत.. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे 'हे' आहेत फायदे; डिलिव्हरी बॉयला मिळेल लाभ

e-Shram Portal Registration : केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील ३०.५८ कोटी कामगार नोंदणीकृत आहेत. अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तुम्हाला सरकारकडून मदत मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 11:18 IST2025-02-09T11:17:38+5:302025-02-09T11:18:32+5:30

e-Shram Portal Registration : केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील ३०.५८ कोटी कामगार नोंदणीकृत आहेत. अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तुम्हाला सरकारकडून मदत मिळते.

e shram portal online registration process for delivery boys | कुटुंबाला मिळते २ लाखांची मदत.. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे 'हे' आहेत फायदे; डिलिव्हरी बॉयला मिळेल लाभ

कुटुंबाला मिळते २ लाखांची मदत.. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे 'हे' आहेत फायदे; डिलिव्हरी बॉयला मिळेल लाभ

e-Shram Portal Registration : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना गीग कामगारांसाठी मोठी घोषणा केली होती. तासिका किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या गीग वर्कर्ससाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. याचा फायदा सुमारे १ कोटी कामगारांना होणार आहे. गीग कामगारांच्या श्रेणीमध्ये सेल्समन/हेल्पर, ऑटो चालक, ड्रायव्हर, पंक्चर दुरुस्ती करणारे, मेंढपाळ, दुग्ध उत्पादक शेतकरी, सर्व पशुपालक, पेपर विक्रेते, डिलिव्हरी बॉय, वीटभट्ट्यांवर काम करणारे मजूर इत्यादींचा समावेश आहे. याची नोंदणी कशी करायची? आणि त्याचा काय फायदा होणार? याची माहिती घेऊ.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे फायदे काय?
केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील ३०.५८ कोटी कामगार नोंदणीकृत आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गीग कामगारांना अनेक फायदे मिळतात. नोंदणी असलेल्या कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला २ लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. जर तुम्ही अपघातात अपंग झालात तर तुम्हाला १ लाखांपर्यंत मदत मिळते. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे करता येते.

ऑनलाइन नोंदणी कशी करावी?

  • eshram.gov.in या वेबसाइटवर जा.
  • Register on eShram बटणावर क्लिक करा.
  • आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
  • तुम्ही EPFO ​​किंवा ESIC सदस्य आहात की नाही या प्रश्नाचे उत्तर द्या.
  • Send OTP वर क्लिक करा आणि मोबाईलवर मिळालेला OTP टाका.
  • त्यानंतर तुमचा १४ अंकी आधार क्रमांक टाका आणि T&C वर टिक करा.
  • सबमिट वर क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म उघडेल.
  • त्यात तुमची जन्म तारीख, पत्ता, शिक्षण आणि बँक माहिती भरा.
  • सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि संमतीवर टिक करून सबमिट करा.
  • तुमची नोंदणी पूर्ण होईल. तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंटआउट देखील घेऊ शकता.

ऑफलाइन नोंदणी कशी करावी?
जर तुम्ही ते ऑनलाइन करू शकत नसाल तर जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) वर जा. तुमचे आधार कार्ड, आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याची प्रत सोबत ठेवा. CSC ऑपरेटर तुमची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करेल.
 

Web Title: e shram portal online registration process for delivery boys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.