Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?

डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?

Donald Trump Crude Oil: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून (होर्मुजची सामुद्रधुनी) जाणाऱ्या जहाजांना रोखण्याची धमकी दिल्यानंतर जागतिक तेल बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 08:37 IST2026-04-13T08:36:15+5:302026-04-13T08:37:55+5:30

Donald Trump Crude Oil: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून (होर्मुजची सामुद्रधुनी) जाणाऱ्या जहाजांना रोखण्याची धमकी दिल्यानंतर जागतिक तेल बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली.

Donald Trump threat to close the Strait of Hormuz Crude Oil price surge how much did it cost | डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?

डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?

Donald Trump Crude Oil: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून (होर्मुजची सामुद्रधुनी) जाणाऱ्या जहाजांना रोखण्याची धमकी दिल्यानंतर जागतिक तेल बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेल्या आहेत. 'CNN' च्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड सुमारे ८ टक्क्यांनी वाढून १०२ डॉलरवर पोहोचलं, तर अमेरिकन कच्च्या तेलानेही ८% वाढ नोंदवत १०४ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार केला.

शेअर बाजारावर तेलाच्या किमतीतील वाढीचा परिणाम

तेलाच्या किमतीतील या दरवाढीचा थेट परिणाम शेअर बाजारावरही झाला. डाऊ फ्युचर्स १.०४% म्हणजेच ५०२ अंकांच्या घसरणीसह खाली आले. तसेच, एसअँडपी ५०० फ्युचर्समध्ये १% आणि नॅस्डॅक फ्युचर्समध्ये १.१५% घसरण नोंदवण्यात आली. ट्रम्प यांनी रविवारी स्पष्ट केलं की, अमेरिका इराणला त्यांच्या पसंतीच्या देशांना तेल विकू देणार नाही. त्यांनी म्हटले की, "एकतर हे सर्वांसाठी असेल किंवा कोणासाठीही नसेल."

इराणकडून प्रति जहाज २० लाख डॉलरपर्यंत शुल्क वसुली

गेल्या आठवड्यात युद्धविरामाच्या चर्चेचे संकेत मिळाल्यानंतर तेलाच्या किमती काहीशा नरमल्या होत्या, परंतु स्थायी कराराची अनिश्चितता आणि मुदत जवळ आल्यामुळे किमतीत पुन्हा तेजी आली आहे. दरम्यान, या संघर्षामुळे इराणला आर्थिक फायदा झाला आहे. अहवालानुसार, इराण 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून जाणाऱ्या जहाजांकडून प्रति जहाज २० लाख डॉलरपर्यंत शुल्क वसूल करत आहे. तसेच, मार्चपर्यंत इराणने दररोज सरासरी १८.५ लाख बॅरल कच्च्या तेलाची निर्यात केली आहे, जी मागील महिन्यांच्या तुलनेत अधिक आहे.

या वर्षात ११८ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले दर

ब्रेंट क्रूड तेलान २०२६ वर्षाची सुरुवात ६१ डॉलर प्रति बॅरलपासून केली होती आणि मार्चच्या अखेरीस हा दर ११८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. या तिमाहीत झालेली ही दरवाढ १९८८ नंतरची महागाई-समायोजित आधारावरील सर्वात मोठी वाढ ठरली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान मध्यपूर्वेतील संघर्षाच्या वाढत्या जोखमीमुळे ब्रेंटच्या किमती ६१ डॉलरवरून ७२ डॉलरवर गेल्या होत्या. त्यानंतर, या भागात लष्करी कारवाई सुरू झाल्यामुळे किमती अधिक वाढल्या, विशेषतः जेव्हा होर्मुज सामुद्रधुनीतून जाणारी बहुतेक शिपिंग वाहतूक थांबली, कारण इराणी हल्ल्यांच्या धोक्यामुळे जहाजांना प्रत्यक्ष हानी पोहोचण्याची भीती होती.

Web Title : ट्रंप की होर्मुज जलसंधि धमकी से कच्चे तेल की कीमतों में उछाल

Web Summary : ट्रंप की होर्मुज जलसंधि में जहाजों को रोकने की धमकी से कच्चे तेल की कीमतें बढ़ीं, जो 100 डॉलर प्रति बैरल से अधिक हो गईं। शेयर बाजार में गिरावट आई। ईरान जलसंधि से गुजरने वाले जहाजों से शुल्क वसूल कर लाभान्वित हो रहा है, जिससे तेल का निर्यात बढ़ा है। ब्रेंट क्रूड में भारी उछाल आया।

Web Title : Trump's Hormuz Strait Threat Sparks Crude Oil Price Surge

Web Summary : Trump's threat to block ships in the Strait of Hormuz caused crude oil prices to jump, exceeding $100 per barrel. Share markets declined. Iran benefits by charging ships passing through the strait, exporting more oil. Brent crude saw a massive price surge this year.