America Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ते दररोज नवीन नियम बनवत आहेत. कधी ते शुल्क लादून अमेरिकेच्या हिताबद्दल बोलतात, तर कधी मेक इन अमेरिकाचा नारा देऊन 'अमेरिका फर्स्ट'चा उपदेश करताना दिसतात. हे सर्व देशवासीयांच्या हितासाठी आणि देशाच्या तिजोरीत पैसे भरण्यासाठी केलं जात आहे असा त्यांचा दावा आहे. पण आता समोर आलेले आकडे काही वेगळंच सांगताहेत. जानेवारीपासूनचे त्यांचे गुंतवणुकीचे आकडे पाहून कोणाचेही डोकं चक्रावून जाईल आणि यावर प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे.
ट्रम्प हे एक व्यावसायिक आहेत, त्यामुळे त्यांच्या निर्णयांमुळे त्यांच्या व्यवसायाला फायदा होणं सामान्य आहे. हे ठीक आहे, परंतु गेल्या ६ महिन्यांत त्यांनी केलेल्या गुंतवणुकीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. अमेरिकन माध्यमांनी असा दावा केलाय की २१ जानेवारी रोजी त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, ट्रम्प यांनी बॉन्ड्समध्ये १० कोटी डॉलर्स (सुमारे ८६० कोटी रुपये) पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. हे बॉन्ड्स कंपन्या, राज्यं आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनशी संबंधित आहेत. या काळात त्यांच्या नावावर ६०० हून अधिक व्यवहार झालेत.
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
त्याने कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक?
१२ ऑगस्ट रोजी अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या फाइलिंगमध्ये प्रत्येक व्यवहाराचा डेटा देण्यात आला नव्हता, परंतु अंदाजे अंदाज निश्चितपणे देण्यात आला होता. या फाइलिंगनुसार, ट्रम्प यांनी सिटीग्रुप, मॉर्गन स्टॅनली, वेल्स फार्गो, मेटा, क्वालकॉमसह इतर अनेक कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. कंपन्यांव्यतिरिक्त, त्यांनी राज्ये, काउंटीज, जिल्हे आणि गॅस डिस्ट्रिक्टद्वारे जारी केलेल्या बाँडमध्येही भरपूर पैसे गुंतवले आहेत.
व्हाईट हाऊसनं काय म्हटलं?
व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ट्रम्प त्यांच्या सर्व गुंतवणुकीची माहिती देत राहतात, परंतु त्यात त्यांची किंवा त्यांच्या कुटुंबाची कोणतीही भूमिका नाही. हे एका थर्ड पार्टी गुंतवणूक संस्थेद्वारे मॅनेज केले जाते. त्यांनी सांगितलं की या सर्व गुंतवणुकींशी संबंधित अहवाल देखील फेडरल अधिकाऱ्यांद्वारे सर्टिफाय केले जातात आणि सर्व आवश्यक अनुपालनांची पूर्तता केली जाते. ट्रम्प यांनी अलीकडेच असंही म्हटलं होतं की त्यांचा सर्व व्यवसाय एका ट्रस्टद्वारे हाताळला जातो, ज्याची काळजी त्यांची मुलं घेतात.
काही वेगळे प्रकरण आहे का?
ट्रम्प प्रशासन आणि अमेरिकन तज्ज्ञ काहीही म्हणोत, पण जर आपण जागतिक बाजारपेठेकडे पाहिले तर सर्वांना ट्रम्प यांच्या गुंतवणुकीवर शंका आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी टॅरिफ वॉर सुरू केला, ज्यामुळे शेअर बाजार आणि इतर वित्तीय बाजारपेठांवर दबाव वाढला, परंतु बाँड्ससारख्या डेट पर्यायांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, ट्रम्प यांनी या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक अनेक प्रश्न उपस्थित करते. सध्या, वृत्तसंस्था रॉयटर्सचा अंदाज आहे की ट्रम्प यांच्याकडे सुमारे १.६ अब्ज डॉलर्स (सुमारे १४ हजार कोटी रुपये) किमतीची मालमत्ता आहे. ते राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.