Donald Trump New Company : डोनाल्ड ट्रम्प आपल्या आक्रमक स्वभावासाठी जगभर ओळखले जातात. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच अनेक झटपट निर्णय घेतले. यामध्ये बहुतांश धोरणात्मक बाबींवर निर्णय घेतले आहेत. पण, गुंतवणुकीबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्षपदी बसल्यानंतर, ट्रम्प यांनी सर्वप्रथम अशा क्षेत्रात ५०० अब्ज डॉलर्स (सुमारे ४३ लाख कोटी) गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये तुमच्या मोबाईल फोनपासून ते विमान आणि दैनंदिन गोष्टींपर्यंत सर्व काही बदलण्याची क्षमता आहे.
या गुंतवणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नवीन कंपनीची स्थापना केली आहे. याच कंपनीच्या माध्यमातून या नवीन क्षेत्रात ४३ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी या कंपनीद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) पायाभूत सुविधांमध्ये ५०० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे ओरॅकल, सॉफ्टबँक आणि ओपन एआय यांच्या भागीदारीत तयार केले जात आहे.
ट्रम्प यांच्या नवीन कंपनीचे नाव काय आहे?
ट्रम्प यांनी सुरू केलेला 'स्टारगेट' नावाचा हा उपक्रम अमेरिकन डेटा सेंटर्समधील तंत्रज्ञान कंपन्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचे प्रतिनिधित्व करतो. या तीन कंपन्यांनी (स्टारगेट, सॉफ्टबँक आणि ओपन एआय) या उपक्रमासाठी आर्थिक मदत देण्याची योजना आखली आहे. इतर गुंतवणूकदारही यामध्ये गुंतवणूक करू शकणार आहेत. हे टेक्सासमध्ये निर्माणाधीन १० डेटा केंद्रांसह सुरू होईल.
सॅम ऑल्टमनवर मोठी जबाबदारी
ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. यावेळी ओरॅकलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी लॅरी एलिसन, सॉफ्टबँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मासायोशी सोन आणि ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन उपस्थित होते. ते म्हणाले की स्टारगेट AI मधील पुढील पिढीच्या प्रगतीला ताकद देण्यासाठी भौतिक आणि आभासी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी त्वरित काम सुरू करेल.
वाचा - ट्रम्प अध्यक्ष होताच असं काय बोलले की सोन्याच्या किमतीत होतेय वाढ; कुठे पोहचले दर?
१ लाख रोजगार निर्मितीची क्षमता
अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, की हे नाव तुमच्या पुस्तकात नोंद करुन ठेवा. कारण, भविष्यात तुम्हाला याबद्दल बरेच काही ऐकायला मिळेल. या कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेत १,००,००० लाख नोकऱ्या निर्माण होतील. साहजिकच, जर AI पायाभूत सुविधा विकसित झाल्या, तर त्याचा फायदा जगभरातील AI तंत्रज्ञानामध्ये वापर होईल. ज्यामध्ये सामान्य माणसाच्या मोबाईलपासून ते विमानापर्यंतच्या सर्व तंत्रज्ञानाचा समावेश आहे.