आधी मंदीची भीती आणि आता गेल्या दोन-तीन वर्षांत एआयमुळे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची लाट सुरूच आहे. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी गृह किंवा वाहनकर्ज घेतलं आहे. जर नोकरीवरून काढले तर ईएमआयचे काय होईल? नोकरी नसताना कर्मचारी त्यांचे कर्ज कसे फेडतील आणि त्यांना त्यांची पुढील नोकरी मिळेपर्यंत ते ईएमआय कसे भरतील? हा प्रश्न निर्माण होतो.
जॉब लॉस विमा
१. जेव्हा नोकऱ्या धोक्यात येतात, तेव्हा तुमच्याकडे तुमचे कर्ज फेडणे तात्पुरते पुढे ढकलण्याचा पर्याय असला पाहिजे. या समस्येवर उपाय म्हणजे जॉब लॉस विमा. अनेक विमा कंपन्या, बँका आणि एनबीएफसी लोकांना पगार आणि जॉबचा विमा देतात.
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
किती ईएमआय कव्हर उपलब्ध आहे?
नोकरी गमावण्याचा विमा पॉलिसीधारकासाठी सामान्यतः तीन ते सहा ईएमआय कव्हर करतो. उदाहरणार्थ, जर एखाद्याची नोकरी गेली तर त्याला तीन ते सहा महिन्यांत नवीन नोकरी शोधावी लागेल. तोपर्यंत विमा कंपनी तुमचे ईएमआय देईल.
हा विमा कोणाला मिळतो?
प्रत्येकजण हा विमा खरेदी करू शकत नाही. कंपन्या सर्वांना नोकरी गमावण्याच्या विम्यासाठी पात्र मानत नाहीत. हा विमा फक्त पूर्णवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच दिला जातो. निवृत्त, बेरोजगार किंवा स्वयंरोजगार असलेले लोक या प्रकारच्या विम्यासाठी पात्र नाहीत. शिवाय, विमा कंपन्या काही वयोमर्यादा लादतात.
विम्याचा प्रीमियम किती आहे?
५% इतका नोकरी गमावण्याच्या विम्याचा प्रीमियम असू शकतो.
