शेअर बाजारातील गुंतवणूक सतत बदलत आहे. एकेकाळी आयटी कंपन्यांचे नाव गुंतवणुकीत पुढे होते. त्यानंतर बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्राने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला होता. आता सौरक्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.
जलद वाढीची नेमकी कारणे काय?
ऊर्जेची मागणी : भारतातील वेगाने वाढणारी वीजमागणी पूर्ण करण्यासाठी सौरऊर्जा हा एक विश्वासार्ह उपाय ठरत आहे, ज्यामुळे सौर कंपन्यांसाठी मोठी संधी निर्माण होत आहे.
सरकारचा पाठिंबा : सरकारांच्या पाठिंब्याने सौरक्षेत्राला स्थिरता मिळत आहे. यामुळे कंपन्यांना अनुदाने आणि करलाभ मिळत असून, सौर कंपन्यांची विक्री आणि नफा वाढतो आहे.
कमी खर्च, नवीन तंत्रज्ञान : तांत्रिक प्रगतीमुळे सौर पॅनेल स्वस्त आणि अधिक कार्यक्षम झाले आहेत, कंपन्यांचा खर्च कमी झाला आहे आणि नफा वाढला आहे.
कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा?
- कंपन्यांची आर्थिक स्थिती, कर्जपातळी आणि रोख प्रवाह तपासा.
- ऑर्डर बुक आणि चालू असलेल्या प्रकल्पांचा अभ्यास.
- चढ-उतारांना घाबरू नका, दीर्घकालीन गुंतवणूक स्वीकारा.
- सरकारी धोरणांवर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवा.