Royal Enfield Bike Price : रॉयल एनफिल्ड ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक उत्पादकांपैकी एक आहे. रॉयल एनफिल्डची बाईक विकत घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. रॉयल एनफिल्डची बुलेट ही आवडत नाही असे म्हणणारे फारच क्वचित लोक असतील. लूक आणि फीचर्सच्या बाबतीत रॉयल एनफिल्ड बुलेट सर्वोत्कृष्ट आहे. आज रॉयल एनफिल्डच्या बाईक्सच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर या बाईकची किंमत सुमारे १,५०,००० रुपयांपासून सुरू होते. रॉयल एनफिल्डच्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध आहेत.
रॉयल एनफिल्डचं बिल व्हायरल
सध्या रॉयल एनफिल्डच्या बाईकचं ३८ वर्षांपूर्वीचं एक बिल चांगलंच व्हायरल होत आहे. हे बिल व्हायरल होण्याचं कारण म्हणजे रॉयल एनफिल्ड बाईकची किंमत. व्हायरल बिल १९८६ सालचं आहे. हे बिल रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० चं आहे. या बिलमध्ये रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जाणून घेऊया ३८ वर्षांपूर्वी रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ची किंमत काय होती.
किती होती किंमत?
आजच्या काळात रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर या बाईकची किंमत सुमारे २.५ लाख रुपये आहे, पण १९८६ मध्ये या बाईकची किंमत फक्त १८,७०० रुपये होती. १९८६ पासून आतापर्यंत या बाईकमध्ये बरेच अपडेट करण्यात आले आहेत. रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० बाईक लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. लूक, फीचर्स आणि मायलेजच्या दृष्टीनं ही बाईक खूप खास आहे. ही बाईक ६ कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. तर बाईकचं मायलेज सुमारे ३७ किमी प्रति लीटर आहे.