लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बँकांनी केवळ ‘टिकमार्क’ पद्धतीने नियमांची पूर्तता न करता, नियमांची खरी भावना समजून ते अमलात आणले पाहिजेत, असे आवाहन आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केले.
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. डिजिटल माध्यमांमुळे सेवा सोप्या झाल्या आहेत, मात्र योग्य नियंत्रण नसल्यास अयोग्य वसुलीचे प्रकार वाढू शकतात, असे ते म्हणाले.
जबाबदारी मानवी हातातच राहिली पाहिजे
मल्होत्रा यांनी सांगितले की, नियमांचे केवळ पालन न करता त्यामागील उद्देश समजून घेणे महत्त्वाचे आहे. जबाबदारी मानवी हातातच राहिली पाहिजे, स्वयंचलनामुळे जबाबदारी कमी होता कामा नये.
