Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्यापार करा किंवा नोकरी, द्यावा लागत नाही टॅक्स; ललित मोदी ज्या देशाचा नागरिक बनला, तो विकतो नागरिकत्व

व्यापार करा किंवा नोकरी, द्यावा लागत नाही टॅक्स; ललित मोदी ज्या देशाचा नागरिक बनला, तो विकतो नागरिकत्व

Lalit Modi News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) माजी अध्यक्ष आणि आयपीएलचा संस्थापक ललित मोदी यांनं टॅक्स हेवन समजल्या जाणाऱ्या एका देशाचं नागरिकत्व मिळवलंय. त्यानं लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:21 IST2025-03-08T14:18:09+5:302025-03-08T14:21:51+5:30

Lalit Modi News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) माजी अध्यक्ष आणि आयपीएलचा संस्थापक ललित मोदी यांनं टॅक्स हेवन समजल्या जाणाऱ्या एका देशाचं नागरिकत्व मिळवलंय. त्यानं लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केलाय.

Do business or a job no tax lalit modi took citizenship of vanuatu it sells citizenship. | व्यापार करा किंवा नोकरी, द्यावा लागत नाही टॅक्स; ललित मोदी ज्या देशाचा नागरिक बनला, तो विकतो नागरिकत्व

व्यापार करा किंवा नोकरी, द्यावा लागत नाही टॅक्स; ललित मोदी ज्या देशाचा नागरिक बनला, तो विकतो नागरिकत्व

Lalit Modi News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) माजी अध्यक्ष आणि आयपीएलचा संस्थापक ललित मोदी यांनं वानुआतुचं नागरिकत्व मिळवलंय. ललित मोदीनं लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केलाय. ललित मोदीनं वनुआतुचे नागरिकत्व मिळवल्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयानंही दुजोरा दिलाय.

ललित मोदीचे कायदेशीर सल्लागार मेहबूब अब्दी यांनी, सरकारनं निर्धारित केलेल्या प्रक्रियेनुसार भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली असल्याचं सांगितलं. वानुआतु हा दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक छोटा सा बेट देश आहे. ललित मोदी वनुआतुचा नागरिक झाल्यानंतर त्याला भारतात परत आणणं सरकारला अधिक अवघड जाणार आहे. वानुआतु इन्व्हेस्टमेंट प्रोग्रॅम अंतर्गत आपलं नागरिकत्व विकतो. टॅक्स हेवन देश असल्याने गेल्या काही काळापासून या बेटावरील देशाचं नागरिकत्व घेण्याचा ट्रेंड वाढत आहे.

सुमारे १ कोटी रुपये खर्च करून तुम्ही वानुआतुचे नागरिक बनू शकता. दीड कोटी रुपयांच्या कुटुंबासह तुम्ही वनुआतुचे नागरिक बनू शकता. हा देश जलद गतीने नागरिकत्वाच्या प्रक्रियेसाठी ओळखला जातो. गुंतवणुकीच्या कार्यक्रमांतर्गत पैसे जमा केल्यानंतर सात आठवड्यांच्या आत नागरिकत्व दिलं जातं. ५५ देश वनुआतुच्या पासपोर्टला व्हिसामुक्त एन्ट्री देतात, तर ३४ देश व्हिसा-ऑन-ए-रिजनल अॅक्सेस देतात. जर एखादी व्यक्ती वानुआतुमध्ये सलग १०. वर्षे राहत असेल तर ती व्यक्ती तिथल्या नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते. जर एखाद्या व्यक्तीनं वानुआतुयेथील मुलाशी किंवा मुलीशी कायदेशीररित्या लग्न केलं असेल आणि गेल्या २ वर्षांपासून एकत्र राहत असेल तर तो नागरिकत्वासाठी देखील अर्ज करू शकतो. मात्र, 'सिटिझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट' हा वानुआतुचा नागरिक होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

देशात राहण्याची गरज नाही

वनुआतुचं नागरिकत्व मिळवण्यासाठी या देशात राहण्याची गरज नाही. वानुआतुमधील अर्जदारांना नागरिकत्व मिळविण्यापूर्वी, दरम्यान किंवा नंतर देशात राहण्याची आवश्यकता नाही. ही लवचिकता विशेषत: जागतिक नागरिकांसाठी फायदेशीर आहे जे दुसऱ्या देशात त्यांचं प्राथमिक निवासस्थान राखण्यास प्राधान्य देतात. वानुआतु दुहेरी नागरिकत्व देखील प्रदान करतो. म्हणजेच एखाद्या भारतीयाला वानुआतू नागरिकत्व हवं असेल तर त्याला भारतीय नागरिकत्व सोडण्याची गरज नाही.

आयकर नाही

वानुआतू आपल्या नागरिकांवर कोणताही वैयक्तिक आयकर लादत नाही. याचा अर्थ इथल्या नागरिकाला स्थानिक असो वा आंतरराष्ट्रीय कोणत्याही उत्पन्नावर कर भरणं बंधनकारक नाही. तसेच देशात भांडवली नफ्यावर कर आकारला जात नाही. म्हणजे स्टॉक, रिअल इस्टेट किंवा इतर मालमत्तेच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातील १०० टक्के रक्कम येथील नागरिक आपल्या खिशात ठेवू शकतो. शिवाय वानुआतु वारसा किंवा मालमत्ता कर वसूल करत नाही.

टॅक्स हेवन देश

वानुआतुची ओळख टॅक्स हेवन देश म्हणून आहे. २००८ सालापर्यंत आपल्या नागरिकांची आर्थिक माहिती इतर देशांशी अजिबात शेअर केली जात नव्हती. नंतर आंतरराष्ट्रीय दबावाखाली ही माहिती देण्याचं मान्य करण्यात आलं. परंतु, करमुक्त देश असल्यानं तेथील नागरिकांशी संबंधित आर्थिक माहिती मिळविणं हे अजूनही एक आव्हान आहे.

Web Title: Do business or a job no tax lalit modi took citizenship of vanuatu it sells citizenship.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.