Lokmat Money > बिझनेस न्यूज > UPI, RTGS, NEFT, IMPS हे डिजिटल पेमेंट कसे काम करते? कुठे किती शुल्क आकारले जाते?

UPI, RTGS, NEFT, IMPS हे डिजिटल पेमेंट कसे काम करते? कुठे किती शुल्क आकारले जाते?

Digital Payments : डिजिटल इंडियामध्ये पैशांच्या व्यवहारांसाठी अनेक इलेक्ट्रॉनिक पद्धती वापरल्या जातात, ज्यामध्ये मुख्य म्हणजे UPI, NEFT, RTGS. या सर्व पद्धती एकमेकांपासून भिन्न आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:24 IST2024-12-09T12:22:42+5:302024-12-09T12:24:12+5:30

Digital Payments : डिजिटल इंडियामध्ये पैशांच्या व्यवहारांसाठी अनेक इलेक्ट्रॉनिक पद्धती वापरल्या जातात, ज्यामध्ये मुख्य म्हणजे UPI, NEFT, RTGS. या सर्व पद्धती एकमेकांपासून भिन्न आहेत.

digital payments difference among upi neft credit lines and rtgs | UPI, RTGS, NEFT, IMPS हे डिजिटल पेमेंट कसे काम करते? कुठे किती शुल्क आकारले जाते?

UPI, RTGS, NEFT, IMPS हे डिजिटल पेमेंट कसे काम करते? कुठे किती शुल्क आकारले जाते?

Digital Payment Tools : देशात डिजिटल पेमेंट सुविधआ सुरू झाल्यापासून सर्व आर्थिक व्यवहार मोबाईलवरुन होऊ लागले आहेत. भाजीच्या जुडीपासून महागड्या गाडीपर्यंत सर्व शुल्क आता ऑनलाईन दिली जात आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत पैसे भरणे आता खूप सुलभ झाले आहे. यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI (Unified Payments Interface), मोबाईल वॉलेट, NEFT (National Electronic Funds Transfer), RTGS (Real Time Gross Settlement), IMPS (Immediate Payment Service) अशा अनेक इलेक्ट्रॉनिक पद्धती आहेत. तुम्ही यापैकी बहुतेक सुविधा कधी ना कधी वापरली असेलच. पण, या व्यवहारांमध्ये तुम्हाला किती शुल्क द्यावे लागते माहिती आहे का?

UPI
भारतात आर्थिक व्यवहारांसाठी UPI चा सर्वाधिक वापर होतो. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते सुट्टीच्या दिवशीही २४ तास काम करते. Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या UPI प्लॅटफॉर्मचा वापर करून काही सेकंदात पेमेंट केले जाऊ शकते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश पेमेंटवर कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. याद्वारे तुम्ही १ रुपयांपासून लाख रुपयांपर्यंत पेमेंट कुठल्याही अडथळ्याशिवाय करू शकता.

क्रेडिट लाइन
भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच लघु वित्त बँकांना (Small Finance Bank) UPI द्वारे कर्ज देण्याची परवानगी दिली. याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी करण्यात येणार आहेत. यामुळे दुर्गम ग्रामीण भागातही छोट्या व्यावसायिकांना कर्ज सहज उपलब्ध होणार असून त्यामुळे आर्थिक घडामोडी वाढतील, रोजगार वाढतील आणि ग्रामीण भागाचा अधिक विकास होईल. यापूर्वी काही व्यावसायिक बँकांनाच UPI वर कर्ज देण्याची परवानगी होती.

NEFT
भारतात आरबीआयद्वारे चालवल्या जाणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टममुळे, देशांतर्गत स्तरावर बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करणे खूप सोपे होते. मात्र, या पद्धतीत तुम्ही ठराविक वेळेतच पैशांचा व्यवहार करू शकता.

युपीआयच्या तुलनेत, पेमेंट करण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण, विश्वासार्हता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून NEFT खूप महत्त्वाचे आहे. यासाठी UPI सारख्या स्मार्टफोनची गरज नाही, तर तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारे किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन NEFT करू शकता. पैशाच्या व्यवहाराची ही जुनी पद्धत आहे. ज्यांना तंत्रज्ञानाची फारशी समज नाही त्यांच्यासाठी ही पद्धत उत्तम आहे.

RTGS
मनी ट्रान्सफरच्या या तंत्रात एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. मात्र, यातून पैसे पाठवल्यास शुल्क आकारले जाते. RTGS द्वारे खात्यात पैसे येताच प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे खातेदाराला लगेच पैसे मिळतात.

Web Title: digital payments difference among upi neft credit lines and rtgs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.