lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > डीएचएफएलने थकविले ५० कोटी रुपये

डीएचएफएलने थकविले ५० कोटी रुपये

कंपनीने जारी केलेल्या ५० कोटी रुपयांच्या संरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची (एनसीडी) मूळ रक्कम ३ जुलै, २०२० रोजी परत करावयाची होती. मात्र ती रक्कम परत देण्याची कंपनीची आर्थिक स्थिती नसल्याचे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:16 AM2020-07-06T03:16:22+5:302020-07-06T03:16:57+5:30

कंपनीने जारी केलेल्या ५० कोटी रुपयांच्या संरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची (एनसीडी) मूळ रक्कम ३ जुलै, २०२० रोजी परत करावयाची होती. मात्र ती रक्कम परत देण्याची कंपनीची आर्थिक स्थिती नसल्याचे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे.

DHFL owes Rs 50 crore | डीएचएफएलने थकविले ५० कोटी रुपये

डीएचएफएलने थकविले ५० कोटी रुपये

नवी दिल्ली : मागील वर्षापासून आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पाेरेशन (डीएचएफएल)कडून अपरिवर्तनीय रोख्यांची मुदत संपल्यावरही ५० कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात आलेले नाही.
कंपनीने जारी केलेल्या ५० कोटी रुपयांच्या संरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची (एनसीडी) मूळ रक्कम ३ जुलै, २०२० रोजी परत करावयाची होती. मात्र ती रक्कम परत देण्याची कंपनीची आर्थिक स्थिती नसल्याचे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे.
कंपनीने २९ नोव्हेंबर, २०१९ रोजी दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी संबंधित अधिकारिणीकडे अर्ज दाखल केला असून, त्याबाबत
अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Web Title: DHFL owes Rs 50 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.