देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँकेचाही (पीएनबी) समावेश होतो. ही बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर जबपदस्त व्याज अथवा परतावा देत आहे. आरबीआयने गेल्या वर्षी रेपो दरात १.२५% ची कपात केली. यानंतर, साधारणपणे सर्वच बँकांनी आपले एफडी व्याजदर कमी केले आहेत. तथापि, या कपातीनंतरही, पीएनबी आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर देत आहे. तर जाणून घेऊयात, पंजाब नॅशनल बँकेच्या अशाच एका खास एफडी योजनेसंदर्भात. ज्यात आपण ₹२ लाख जमा करून ₹८१,५६८ पर्यंतचा एक निश्चित परतावा मिळवू शकता.
पीएनबी देतेय ७.२०% पर्यंत व्याज -
पंजाब नॅशनल आपल्या ग्राहकांना बँक एफडी खात्यावर ३.००% पासून ७.२०% पर्यंत व्याज देत आहे. ग्राह या बँकेत किमान ७ दिवस ते कमाल १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडू शकता. पंजाब नॅशनल बँक ३९० दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर सर्वाधिक व्याजदर देते.
३९० दिवसांच्या आणि ५ वर्षांच्या एफडी योजनेवर किती व्याज? -
पीएनबी आपल्या ३९० दिवसांच्या एफडी योजनेवर सामान्य नागरिकांना ६.४० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के तर अतिज्येष्ठ नागरिकांना ७.२० टक्के व्याज देत आहे. तर ५ वर्षांच्या एफडी योजनेवर, सामान्य नागरिकांना ६.१० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ६.६० टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के व्याज देत आहे.
२ लाख रुपयांच्या एफडीवर ८१,५६८ रुपयांपर्यंत व्याज -
आपण सामान्य नागरिक असाल आणि पीएनबीमध्ये ५ वर्षांसाठी २ लाख रुपयांची एफडी केले, तर मॅच्यूरिटीवेळी आपल्याला एकूण २,७०,७०१ रुपये मिळतील, यात ७०,७०१ रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश आहे. याच पद्धतीने, जर आपण ज्येष्ठ नागरिक असाल आणि ५ वर्षांची २ लाख रुपयांची एफडी केली, तर आपल्याला एकूण रु. ७७,४४५ रुपयांचे निश्चित व्याज मिळेल. याच बरोबर आपण अति ज्येष्ठ नागरिक असाल आणि पीएनबीमध्ये ५ वर्षांसाठी २ लाख रुपयांची एफडी केली, तर तिचे मॅच्यूरिटीवेळी २,८१,५६८ रुपये होतील. अर्थात आपल्याल ८१,५६८ रुपये एवढे व्याज मिळेल.
