Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स

Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स

Bank of Baroda Savings Scheme: बँक ऑफ बडोदा मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदामध्ये कोट्यवधी भारतीयांची खाती आहेत.

By जयदीप दाभोळकर | Updated: April 28, 2025 16:04 IST2025-04-28T16:02:13+5:302025-04-28T16:04:24+5:30

Bank of Baroda Savings Scheme: बँक ऑफ बडोदा मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदामध्ये कोट्यवधी भारतीयांची खाती आहेत.

Deposit Rs 100,000 in Bank of Baroda fd scheme get a fixed return of rs 16122 see details | Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स

Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स

Bank of Baroda Savings Scheme: बँक ऑफ बडोदा मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदामध्ये कोट्यवधी भारतीयांची खाती आहेत. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर भरघोस व्याज देत आहे. आज आम्ही तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या एका बचत योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही फक्त १ लाख रुपये जमा करून १६,०२२ रुपयांचं फिक्स्ड व्याज मिळवू शकता. होय, आम्ही बोलत आहोत बँक ऑफ बडोदाच्या २ वर्षांच्या एफडी स्कीमबद्दल.

किती मिळतंय व्याज?

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना विविध मुदतीच्या एफडी योजनांवर ४.२५ टक्क्यांपासून ७.६५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक ४४४ दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर सर्वसामान्यांना ७.१५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदा 2 वर्षांच्या एफडीवर सर्वसामान्यांना ७.०० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के बंपर व्याज देत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर बँक ऑफ बडोदानं आपल्या बचत योजनांच्या व्याजदरात कपात केली.

चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत

१६,०२२ चं निश्चित व्याज मिळणार

बँक ऑफ बडोदाच्या २ वर्षांच्या एफडीमध्ये केवळ १ लाख रुपये जमा करून १६,०२२ रुपयांचं निश्चित व्याज मिळवू शकता. ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सामान्य नागरिकानं बँक ऑफ बडोदामध्ये २ वर्षांच्या एफडीमध्ये १,००,००० रुपये जमा केले तर त्याला मॅच्युरिटीवर एकूण १,१४,८८८ रुपये मिळतील. त्यावर १४ हजार ८८८ रुपये निश्चित व्याज मिळणार आहे. त्याचप्रमाणे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकानं त्यात १,००,००० रुपये जमा केल्यास मुदतपूर्तीनंतर त्यांना एकूण १,१६,०२२ रुपये मिळतील. यात  निश्चित व्याज म्हणून १६,०२२ रुपये मिळतील.

Web Title: Deposit Rs 100,000 in Bank of Baroda fd scheme get a fixed return of rs 16122 see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.