नवी दिल्ली : दिवस-रात्र धावपळ करून घराघरांत सेवा पोहोचवणारे डिलिव्हरी बॉईज, कॅब ड्रायव्हर्स (गिग वर्कर्स) यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ‘सोशल सिक्युरिटी कोड २०२०’ अंतर्गत नवीन नियमांचा मसुदा जाहीर करण्यात आला असून, यामुळे लाखो कामगारांना आता आरोग्य विमा, अपघाती विमा आणि पेन्शन यासारख्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नुकत्याच झालेल्या कामगारांच्या संपानंतर सरकारने हे पाऊल उचलले असून, सध्या या नियमांवर जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.
काय करावे लागेल?
सुविधा मिळवण्यासाठी वर्षातून किमान ९० दिवस एकाच कंपनीत काम करणे आवश्यक आहे. १६ वर्षांवरील तरुण पात्र, मात्र ६० वर्षे पूर्ण झाल्यावर ही पात्रता संपुष्टात येईल.
नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य असून, कामगारांना पोर्टलवरून ‘डिजिटल आयडी कार्ड’ डाऊनलोड करता येईल. यामुळे त्यांना देशभरात ओळख सिद्ध करता येईल.
