Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता OTP द्वारे होणार नाही फसवणूक; बँकेकडून 'इन-अ‍ॅप मोबाइल OTP' फीचर लाँच; कसे करते काम?

आता OTP द्वारे होणार नाही फसवणूक; बँकेकडून 'इन-अ‍ॅप मोबाइल OTP' फीचर लाँच; कसे करते काम?

cyber banking fraud : डिजिटल बँकिंगमध्ये सायबर धोक्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष करुन ओटीपीद्वारे लोकांची बँक खाती रिकामी केली जात आहे. हा धोका टाळण्यासाठी आता नवीन सिस्टीम आणली गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:45 IST2025-04-08T15:43:59+5:302025-04-08T15:45:04+5:30

cyber banking fraud : डिजिटल बँकिंगमध्ये सायबर धोक्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष करुन ओटीपीद्वारे लोकांची बँक खाती रिकामी केली जात आहे. हा धोका टाळण्यासाठी आता नवीन सिस्टीम आणली गेली आहे.

cyber crime not possible now because axix bank come out with in app mobile otp feature | आता OTP द्वारे होणार नाही फसवणूक; बँकेकडून 'इन-अ‍ॅप मोबाइल OTP' फीचर लाँच; कसे करते काम?

आता OTP द्वारे होणार नाही फसवणूक; बँकेकडून 'इन-अ‍ॅप मोबाइल OTP' फीचर लाँच; कसे करते काम?

cyber banking fraud : आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारी एक मोठी समस्या बनली आहे, ज्यामुळे व्यक्ती आणि संस्था दोघांनाही धोका निर्माण झाला आहे. सरकारने विविध उपाययोजना करुनही घटना कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. गेल्या २ महिन्यांपासून तुम्हीही कॉलरट्यूनला यासंबंधी सूचना ऐकली असेल. ओटीपीद्वारे (वन-टाइम पासवर्ड) वैयक्तिक किंवा बँकिंग फसवणुकीची हजारो प्रकरणे तुम्ही ऐकली असतील. कोणीतरी फोन करून ओटीपी घेतला आणि बँक खाते रिकामे केले. काही प्रकरणात तर तुमचा फोन हॅक करुनही ओटीपी मिळवला जातो. आता हा धोका ओळखून, अ‍ॅक्सिस बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. बँकेने 'इन-अ‍ॅप मोबाईल ओटीपी' सुरू केले आहे.

एसएमएसद्वारे ओटीपी पाठवण्याची आवश्यकता नाही
अ‍ॅक्सिस बँकेने सुरू केलेल्या 'इन-अ‍ॅप मोबाइल ओटीपी' फीचरमुळे एसएमएसद्वारे ओटीपी पाठवण्याची गरज दूर होईल. हे फीचर एसएमएसद्वारे ओटीपी पाठवण्याऐवजी अ‍ॅपमध्ये टाइम-बेस्ड वन-टाइम पासवर्ड (TOTP) जनरेट करेल. ज्यामुळे टेलिकॉम नेटवर्कची गरज राहणार नाही. अशा परिस्थितीत फसवणूक करणाऱ्याने ओटीपी मिळवला तरी तो फसवणूक करू शकणार नाही. याव्यतिरिक्त, या फीचरमुळे जलद ऑथेंटिकेशन होईल. अ‍ॅक्सिस बँकेचे अध्यक्ष आणि प्रमुख - डिजिटल बिझनेस अँड ट्रान्सफॉर्मेशन समीर शेट्टी म्हणाले: “अ‍ॅक्सिस बँकेत, आम्ही फसवणुकीच्या घटना कमी करण्यासाठी आणि ग्राहकांची सुरक्षितता सुधारण्यासाठी सतत पावले उचलत आहोत.

सिम स्वॅप आणि फिशिंग हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही महिन्यात सिम स्वॅप आणि फिशिंग हल्ल्यांचे प्रमाण वाढलं आहे. अशा परिस्थितीत इन-अॅप मोबाइल ओटीपी हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतो. ग्राहक इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करण्यासाठी आणि व्यवहार प्रमाणित करण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात. ही सेवा जगभरात उपलब्ध असून इंटरनेटद्वारे काम करते, त्यामुळे परदेशात प्रवास करतानाही ऑथेंटिकेशन करताना कोणताही व्यत्यय येत नाही. याव्यतिरिक्त, ग्राहकांना लॉगिन आणि व्यवहार करताना रिअल-टाइम सूचना मिळतात. लवकरच इतर बँकाही अशा प्रकारची सोय उपलब्ध करुन देण्याची शक्यता आहे.

वाचा - ट्रम्प टॅरिफचा सामना करण्यासाठी व्याजदरात कपात होणार का? पाहा काय म्हणतात एक्सपर्ट्स

सायबर गुन्हेगारीपासून बचाव कसा करावा?

  • मजबूत पासवर्ड वापरा : तुमच्या ऑनलाइन अकाउंट्ससाठी मजबूत आणि वेगळे पासवर्ड वापरा.
  • Two-Factor Authentication : शक्य असल्यास तुमच्या अकाउंट्ससाठी Two-Factor Authentication सुरू करा.
  • संशयास्पद ईमेल किंवा मेसेजमधील लिंक्स किंवा अटॅचमेंट्स उघडू नका.
  • तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम, ब्राउझर आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअरला नियमितपणे अपडेट करा.
  • सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरताना संवेदनशील माहिती शेअर करणे टाळा.
  • 'https://' ने सुरू होणाऱ्या आणि लॉक (Lock) चिन्ह असलेल्या वेबसाइट्सच वापरा.
  • ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर तुमची वैयक्तिक माहिती कमीत कमी शेअर करा.
  • तुमच्या कॉम्प्युटर आणि मोबाईलमध्ये चांगल्या प्रतीचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इंस्टॉल करा आणि ते नियमितपणे अपडेट करा.
  • ऑनलाइन जगात काहीतरी खूपच आकर्षक किंवा मोफत वाटत असेल, तर ते सहसा फसवे असू शकते.
     

Web Title: cyber crime not possible now because axix bank come out with in app mobile otp feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.