Lokmat Money > बिझनेस न्यूज > GST समन्सच्या नावाखाली नवीन सायबर फ्रॉड; फक्त 'या' मॅसेजमुळे उच्चशिक्षित पडताहेत बळी

GST समन्सच्या नावाखाली नवीन सायबर फ्रॉड; फक्त 'या' मॅसेजमुळे उच्चशिक्षित पडताहेत बळी

GST Fraud : अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे. आता जीएसटी समन्सच्या नावाखाली लोकांची बँक खाती रिकामी केली जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 15:14 IST2025-01-26T15:14:29+5:302025-01-26T15:14:51+5:30

GST Fraud : अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे. आता जीएसटी समन्सच्या नावाखाली लोकांची बँक खाती रिकामी केली जात आहेत.

cyber crime beware from fraudsters issuing fake summons related to gst | GST समन्सच्या नावाखाली नवीन सायबर फ्रॉड; फक्त 'या' मॅसेजमुळे उच्चशिक्षित पडताहेत बळी

GST समन्सच्या नावाखाली नवीन सायबर फ्रॉड; फक्त 'या' मॅसेजमुळे उच्चशिक्षित पडताहेत बळी

GST Fraud : आता मोबाईलवर कॉलर ट्यून ऐवजी सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सावध राहण्याच्या सूचना ऐकायला मिळतात. मात्र, सरकारने इतकं सगळं करुनही लोक याला बळी पडतच आहेत. धक्कादायक म्हणजे सायबर फसवणुकीत अडकणारे ९० टक्के लोक हे शिक्षित आहेत. म्हणजे आपण पावलोपावली डोळस राहण्याची गरज आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे बाजारात आता नवीन जीएसटी समन्स घोटाळा आला आहे. GST सारख्या अप्रत्यक्ष करांचे व्यवस्थापन करणाऱ्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) यावरुन लोकांना आवाहन केलंय. नेमका हा घोटाळा काय आहे? लोकं याला कशी बळी पडतात?

जीएसटी समन्स पाठवून कशी फसवणूक होते?
व्यावसायिकाला प्रत्येक महिन्याला जीएसटी परतावा भरावा लागतो. याच गोष्टीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी लोकांना बनावट जीएसटी समन्स पाठवायला सुरुवात केली आहे. तुम्हाला एक संदेश पाठवण्यात येतो. यामध्ये सीबीकच्या इंटेलिजेन्स डायरेक्टरेट जनरल (DGGI) किंवा CGST कार्यालयांतर्गत चालू असलेल्या काही तपासाचा भाग म्हणून पाठवल्याचा दावा केलेला असतो. जीएसटी समन्स आल्याचे पाहून व्यवसायिक गांगरुन जातात. त्यानंतर त्यांच्याकडे बँकेची संवेदनशी माहिती विचारली जाते. बऱ्याचदा ओटीपीच्या सहाय्याने बँक खाते रिकामे केले जाते.

जीएसटी समन्स फ्रॉडपासून कसं सुरक्षित राहायचं?

  • तुम्हाला कुठल्याही प्रकारे जीएसटी समन्स किंवा अन्य कोणता संदेश आला तर तो तपासल्याशिवाय निर्णय घेऊ नये.
  • CBIC पोर्टल या esanchar.cbic.gov.in/DIN/DINSearch विभागात जा.
  • Verify CBIC-DIN विंडो वर जा
  • इथं तुम्हाला मिळालेला संदेश खरा की खोटा याची माहिती मिळेलय

 

बनावट जीएसटी समन्स आले तर काय कराल?

  • सर्वप्रथम DGGI किंवा CGST प्राधिकरणाशी त्वरित संपर्क साधा
  • फसव्या समन्स किंवा इतर संशयास्पद घडामोडींची माहिती द्या.
  • तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करणे टाळा

Web Title: cyber crime beware from fraudsters issuing fake summons related to gst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.