ग्राहकांनी केली सोन्याची लयलूट
By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:23+5:302014-10-03T22:56:23+5:30

ग्राहकांनी केली सोन्याची लयलूट
>शहरात सोन्याची उलाढाल शंभर कोटींवर, सराफी दुकाने फुलली गर्दीने पुणे : विजया दशमीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची लयलूट केली. शहरात सोन्याची उलाढाल शंभर कोटी रुपयांच्या वर झाल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दसर्याच्या महूर्तावर सोने-चांदी, वाहन, सदनिका अथवा एखाद्या शुभ कार्याची खरेदी करण्याची पद्धत आहे. विशेषत: मूहुर्ताला सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे खरेदीबरोबरच भरगोस परताव्याची हमी असणारी गुंतवणुक देखील होत असते. त्यामुळे दसरा, दिवाळी पाडवा, गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया या सारख्या मुहूर्तावर खरेदी करणार्यांचे प्रमाण मोठे आहे. तसेच दिवाळीनंतर लग्नसराई सुरु होत असल्याने महूर्ताला देखील वधू अथवा वराचे दागिने खरेदी केले जातात. घरची पुजा आटोपल्यानंतर सोने खरेदी करण्यासाठी नागरीक दुपारनंतर बाहेर पडले. सायंकाळी उशीरापर्यंत लक्ष्मी रस्ता व शहरातील विविध सराफी दुकानात नागरिकांची गर्दी दिसत होती. सराफी असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले, मुहूर्तावर सोने खरेदी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यंदा देखील थोडे का होईना सोन्याची खरेदी करण्याची परंपरा पुणेकरांनी राखली. सर्व प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांना मागणी होती. शहरात अंदाजे शंभर कोटी रुपयांची उलाढाल झाली. पू. ना. गाडगीळ ॲण्ड सन्सचे भागिदार अजित गाडगीळ म्हणाले, सोन्यामध्ये गुंतवणुकी बरोबरच मुहूर्तावर खरेदी करणार्यांचे प्रमाण देखील चांगले आहे. तसेच दिवाळीनंतर लग्नसराई सुरु होत असल्याने काही जणांनी त्यासाठी देखील खरेदी केली. मंगळसूत्र, वेढणी, सोनसाखळी अशा सर्व प्रकारच्या सोन्याच्या दागिन्याला चांगली मागणी होती. शुक्रवारी (दि.३) २४ कॅरेट सोन्याचा भाव २७ हजार ३५०, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २६,७५० रुपये होता.