Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नेटफ्लिक्स रिन्यू करताना मुंबईकर फसला! १.२५ लाखांच्या फसवणुकीनंतर ग्राहक आयोगाचा मोठा निकाल

नेटफ्लिक्स रिन्यू करताना मुंबईकर फसला! १.२५ लाखांच्या फसवणुकीनंतर ग्राहक आयोगाचा मोठा निकाल

Cyber Crime : आरबीआयच्या नियमांनुसार, ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे होणारे नुकसान ग्राहकाने सहन करावे. बँकेने सुरक्षित ओटीपी प्रमाणीकरणानंतर व्यवहाराची प्रक्रिया केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:03 IST2026-02-05T12:52:13+5:302026-02-05T13:03:08+5:30

Cyber Crime : आरबीआयच्या नियमांनुसार, ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे होणारे नुकसान ग्राहकाने सहन करावे. बँकेने सुरक्षित ओटीपी प्रमाणीकरणानंतर व्यवहाराची प्रक्रिया केली आहे.

Customer Responsible for OTP Fraud Mumbai Consumer Court Dismisses ₹1.25 Lakh Claim Against HDFC Bank | नेटफ्लिक्स रिन्यू करताना मुंबईकर फसला! १.२५ लाखांच्या फसवणुकीनंतर ग्राहक आयोगाचा मोठा निकाल

नेटफ्लिक्स रिन्यू करताना मुंबईकर फसला! १.२५ लाखांच्या फसवणुकीनंतर ग्राहक आयोगाचा मोठा निकाल

OTP Fraud : ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांमध्ये ग्राहक आयोगाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जर ग्राहकाने स्वतःहून आपला 'वन-टाइम पासवर्ड' अर्थात ओटीपी अनोळखी व्यक्ती किंवा लिंकवर शेअर केला, तर त्यासाठी बँकेला जबाबदार धरता येणार नाही, असे स्पष्ट करत मुंबईतील एका ग्राहकाची तक्रार आयोगाने फेटाळून लावली आहे.

नेमके प्रकरण काय?
मुंबईतील एका व्यक्तीने जानेवारी २०२२ मध्ये आपले 'नेटफ्लिक्स' सबस्क्रिप्शन रिन्यू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला एक बनावट ईमेल लिंक प्राप्त झाली. ती अधिकृत लिंक असल्याचे समजून तक्रारदाराने त्यावर क्लिक केले आणि आपल्या एचडीएफसी बँकेच्या कार्डची माहिती भरली. त्यानंतर आलेला ओटीपी टाकताच, केवळ ७९९ रुपयांऐवजी त्याच्या खात्यातून १,२५,६६५ रुपये लंपास झाले.

बँकेची भूमिका आणि आयोगाचा निकाल
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकाने बँकेकडे धाव घेतली, मात्र बँकेने ही तक्रार बंद केली. अखेर हे प्रकरण जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे (उपनगर) पोहोचले. अध्यक्ष प्रदीप कडू आणि सदस्य गौरी कापसे यांच्या खंडपीठाने मान्य केले की ग्राहक फसवणुकीचा बळी ठरला आहे. मात्र, ही फसवणूक ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, जर ग्राहकाच्या हलगर्जीपणामुळे (उदा. ओटीपी शेअर करणे) आर्थिक नुकसान झाले, तर ते पूर्णपणे ग्राहकालाच सोसावे लागते.

बनावट लिंक ठरली कारणीभूत
बँकेने आपली बाजू मांडताना सांगितले की, व्यवहार पूर्णपणे सुरक्षित मोडमध्ये झाला होता. ग्राहकाने स्वतःहून बनावट लिंकवर माहिती भरली आणि गोपनीय ओटीपी टाकला. सर्व माहिती अचूक असल्याने हा व्यवहार रोखण्याचे बँकेकडे कोणतेही तांत्रिक कारण नव्हते. आयोगाने बँकेचा हा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि बँकेच्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे स्पष्ट केले.

वाचा - 'किंग' कोहलीच्या संघासाठी अब्जाधीशांची चढाओढ; आरसीबीचे सध्याचे मूल्य पाहून डोळे विस्फारतील

सायबर सुरक्षिततेसाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  1. ओटीपी कधीही शेअर करू नका : बँक अधिकारी किंवा कोणताही अधिकृत प्रतिनिधी फोन किंवा ईमेलवर ओटीपी मागत नाही.
  2. ईमेल लिंक्सची खात्री करा : सबस्क्रिप्शन किंवा पेमेंटसाठी येणाऱ्या ईमेलमधील लिंक अधिकृत आहे की नाही, याची पडताळणी करा.
  3. तातडीने तक्रार करा : फसवणूक झाल्यास १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधा.
     

Web Title : नेटफ्लिक्स नवीनीकरण में मुंबईकर को 1.25 लाख का चूना लगा।

Web Summary : मुंबई के एक ग्राहक को नकली लिंक के माध्यम से नेटफ्लिक्स का नवीनीकरण करते समय ₹1.25 लाख का नुकसान हुआ। उपभोक्ता फोरम ने उसकी शिकायत खारिज कर दी, जिसमें कहा गया कि ओटीपी साझा करने से धोखाधड़ी हुई, जिससे वह आरबीआई के दिशानिर्देशों के अनुसार उत्तरदायी है।

Web Title : Mumbai man loses ₹1.25 Lakh in Netflix renewal scam.

Web Summary : Mumbai consumer lost ₹1.25 Lakh renewing Netflix via a fake link. The consumer forum dismissed his complaint, stating sharing OTP led to the fraud, making him liable as per RBI guidelines.