lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सावधान! सॅनिटाइज करून धुतल्यानं 2000च्या 17 कोटींच्या नोटा झाल्या खराब, तुम्ही करू नका ही चूक

सावधान! सॅनिटाइज करून धुतल्यानं 2000च्या 17 कोटींच्या नोटा झाल्या खराब, तुम्ही करू नका ही चूक

यावेळी 2 हजारांच्या 17 कोटींहून अधिक नोटा RBIकडे आल्या आहेत. याखेरीज 200, 500, 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचीही स्थिती खूप वाईट होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:22 PM2020-08-29T14:22:12+5:302020-08-29T14:22:25+5:30

यावेळी 2 हजारांच्या 17 कोटींहून अधिक नोटा RBIकडे आल्या आहेत. याखेरीज 200, 500, 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचीही स्थिती खूप वाईट होती.

covid19 lockdown sanitizing washing and drying spoils 17 crores notes of 2000 rupee | सावधान! सॅनिटाइज करून धुतल्यानं 2000च्या 17 कोटींच्या नोटा झाल्या खराब, तुम्ही करू नका ही चूक

सावधान! सॅनिटाइज करून धुतल्यानं 2000च्या 17 कोटींच्या नोटा झाल्या खराब, तुम्ही करू नका ही चूक

कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, भारतालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. कोरोना काळात अनेक गोष्टींचे नुकसान झाले आहे. मग तो व्यवसाय असो, वाहतूक, रोजगार किंवा इतर काहीही असो. संसर्गाच्या भीतीने लोकांनी चलनातील नोटासुद्धा स्वच्छ केल्या आहेत. त्यामुळे नोटा स्वच्छ धुऊन, उन्हात वाळवून मोठ्या प्रमाणात चलनी नोटा खराब झाल्या आहेत. हेच कारण आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक(RBI)पर्यंत पोहोचणार्‍या खराब नोटांच्या संख्या आजपर्यंतचा सर्वात उच्चांक गाठला आहे. जास्तीत जास्त दोन हजार रुपयांच्या नोटांचे नुकसान झाले आहे. यावेळी 2 हजारांच्या 17 कोटी मूल्याच्या नोटा RBIकडे आल्या आहेत. याखेरीज 200, 500, 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचीही स्थिती खूप वाईट होती.

आरबीआयच्या अहवालानुसार यावर्षी दोन हजार रुपयांच्या 17 कोटींच्या नोटा खराब झाल्या आहेत. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 300 पट जास्त आहे. काही काळासाठी कोरोना संसर्गाची भीती पसरल्यापासून लोकांनी नोटा धुवायला सुरुवात केली, स्वच्छ केल्या आणि उन्हात वाळवायला सुरुवात केली. बँकांमधल्या नोटांच्या बंडलांवरही सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. याचा परिणाम म्हणून, जुन्या चलनी नोटा सोडा आणि नवीन चलन देखील एका वर्षात खराब झाले आहे.

कोरोनाचा नोटांवर असा पडला प्रभाव
मागील वर्षी 2000च्या 6 लाखांच्या नोटा आल्या. यावेळी ही संख्या 17 कोटींच्या पुढे गेली आहे. 500च्या नवीन चलनी नोटा दहापट खराब झाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत दोनशेच्या नोटा 300 पटीने जास्त खराब बनल्या. 20चे नवीन चलन एका वर्षात 20पेक्षा जास्त वेळा खराब झाले

जाणून घ्या, कोणत्या वर्षी किती खराब नोटा आल्या
जर आपण 2017-18 वर्षाबद्दल बोलत असाल तर त्यावेळी 2 हजारांच्या एक लाखांच्या नोटा आरबीआयकडे आल्या. त्याचबरोबर 2018-19मध्ये ही संख्या 6 लाखांवर पोहोचली. यावर्षी या संख्येने सर्व विक्रम मोडले. सन 2019-20मध्ये 2 हजारांच्या 17.68 कोटी नोटा आरबीआयकडे आल्या. त्याचप्रमाणे आपण 500च्या नोटा, 2017-18मध्ये 1 लाख, 2018-19मध्ये 1.54 कोटी आणि 2019-20 मध्ये 16.45 कोटी नोटा आरबीआयकडे आल्या. प्रत्येक वर्षी आरबीआयकडे सर्वात जास्त 10, 20 आणि 50 खराब नोटा येत असतात. आरबीआयने जाहीर केलेल्या 2019-20 च्या वार्षिक अहवालात 200 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांचा ट्रेंड वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे.
 

Web Title: covid19 lockdown sanitizing washing and drying spoils 17 crores notes of 2000 rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.