अकोला : यंदा उशिरा सुरू झालेला पाऊस आणि पेरणीनंतर पडलेला पावसाचा ताण याचा पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, राज्यातील कापसाचे उत्पादन यंदा ३0 ते ३५ टक्के घटले आहे.
राज्यात जवळपास ४0 लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे असून, त्यातील १७ लाख विदर्भ, १५ लाख हेक्टर मराठवाडा उर्वरित क्षेत्र खान्देशात आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकर्यांनी २३ जुलैनंतर पेरणीला सुरुवात केली आहे. बीटी कापूस पेरणीची वेळ १५ जुलैपर्यंत होती. तथापि शेतकर्यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बीटीची पेरणी केली. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला असल्याने कापसाच्या झाडाची वाढ खुंटली होती. का पसाची झाड अपरिपक्व निघाल्याने त्याचा कापूस उत्पादनावर परिणाम झाला असून, एकरी सरासरी दोन क्विंटलच्यावर उतारा नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
विदर्भाचा विचार केल्यास यंदा सर्वाधिक कापसाचे १0 लाख हे क्टर क्षेत्र पश्चिम विदर्भात आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्हा सोडला तर उर्वरित अकोला, वाशिम, बुलडाणा व यव तमाळ या चार जिल्हय़ात सरासरी ४0 टक्के पाऊस अद्याप कमी आहे. त्याचा परिणाम कापूस पिकावर झाला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
*शासनाने दखल घ्यावी!
केंद्रीय कृषी विभागाने हमीभाव जाहीर करताना कापूस उत्पादक शेतकर्यांची घोर निराशा केली आहे. यातच राज्यातील कापूस क्षेत्राला अतवृष्टीचा फटका बसला आहे आणि हमीदर ३९00 च्यावर नसल्याने साधा उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षितता म्हणून राज्य शासनाने कापसाला प्र ितक्विंटल ७ ते ८ हजार रुपये भाव द्यावे, अशी मागणी शे तकर्यांकडून केली जात आहे.
कापसाचे उत्पादन घटले!
विदर्भ, मराठवाड्याला सर्वाधिक फटका.
By admin | Updated: November 24, 2014 01:51 IST2014-11-24T01:51:18+5:302014-11-24T01:51:18+5:30
विदर्भ, मराठवाड्याला सर्वाधिक फटका.
_ns.jpg)