कट...मनपाने नकाशा मंजुरीसाठी ऑटोडीसीआर प्रणाली लागू करावी. याकरिता नागपूर पॅटर्नचा वापर करावा. त्यामध्ये नियमानुसार बांधकाम नकाशा सहज उपलब्ध होतो.-सिमरन नागरा, बांधकाम व्यावसायिक-फोटो-0४सीटीसीएल-४१-कोट...अपुर्या एफएसआयमुळे बांधकाम व्यवसायात अडचणी निर्माण होत असल्याची पुरेपूर जाणीव आहे. एफएसआय वाढविण्यासाठी राज्य शासनाने मुंबई मनपा आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली कुंटे समितीचे गठन केले असून, समितीकडून सूचनांचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. यादरम्यान, नगर रचना विभागातील उपसंचालक नगर रचनाकार, सहाय्यक संचालक नगर रचनाकार तसेच नगर रचनाकार आदी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने निर्णय घेताना, प्रशासनालासुध्दा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारी मोजणी सर्वांना बंधनकारक असून, नियमानुसारच नकाशा मंजूर केला जाईल. -संदीप गावंडे सहाय्यक नगर रचनाकार मनपा-फोटो-0४सीटीसीएल-३५--कोट...नगर रचना विभागातील वरिष्ठ अधिकार्यांची पदे रिक्त असल्यामुळे शासनासोबत पत्र व्यवहार करताना तांत्रिक अडचणी निर्माण होतात. अधिकार्यांच्या रिक्त पदांसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करण्यात आला. आस्थापना खर्चात वाढ झाल्याने कर्मचार्यांची नेमणूक करणे शक्य नाही. एफएसआयच्या मुद्यावर मेट्रो शहरांसोबत तुलना करता येणार नाही. नियमानुसार बांधकाम केल्यास कोणालाही त्रास होणार नाही. ऑटोडीसीआर प्रणालीचा खर्च जास्त असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी मदतीसाठी समोर यावे. तरच बांधकामाच्या समस्या हळूहळू निकाली निघतील. आम्ही सकारात्मक आहोत.-दयानंद चिंचोलीकर उपायुक्त मनपा-फोटो-0४सीटीसीएल-३७--
समन्वय हवा-जोड बातमी २
कोट...
By admin | Updated: December 3, 2014 22:35 IST2014-12-03T22:35:41+5:302014-12-03T22:35:41+5:30
कोट...
