३० नोव्हेंबरची अंतिम मुदत जवळ येत आहे आणि त्यापूर्वी काही महत्त्वाची आर्थिक आणि कागदपत्रांची कामे पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही कामे अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण न केल्यास केवळ समस्या निर्माण होऊ शकतातच, शिवाय मोठा दंडही होऊ शकतो. म्हणूनच, ही महत्त्वाची कामं वेळेवर पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एंजेल वनच्या मते, वेळेवर टॅक्स कम्प्लायन्स पूर्ण केल्यानं आर्थिक व्यवस्थापन सोपं होतं आणि करदात्यांना अनावश्यक व्याज किंवा दंड आकारण्यापासून वाचण्यास मदत होते.
पुढील काही दिवसांत म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक कामं पूर्ण करणं आवश्यक आहे. यामध्ये टीडीएस (TDS) रिटर्न भरण्यापासून ते पीएनबी (PNB) केवायसी (KYC) अपडेटपर्यंत अनेक डेडलाईन्स समाविष्ट आहेत.
आता Apple नं घेतला कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय; 'या' ५ कारणांमुळे कंपनीनं केली घोषणा
१. TDS/TCS रिटर्न आणि चलन जमा करण्याची अंतिम तारीख
अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
तपशील: ऑक्टोबर महिन्यात कपात केलेला कर (टीडीएस) किंवा गोळा केलेला कर (टीसीएस) यासाठी चलन-कम-स्टेटमेंट दाखल करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. आयकर अधिनियमाच्या कलम १९४-आयए, १९४-आयबी, १९४एम, आणि १९४एस अंतर्गत येणाऱ्या कर कपात करणाऱ्यांवर हा नियम लागू होतो. उदाहरण पाहायचं झाल्यास अचल मालमत्तेच्या विक्रीवर टीडीएस, भाड्यावरील टीडीएस, किंवा कंत्राटदार/व्यावसायिकांना केलेल्या पेमेंटवरील टीडीएस इत्यादींचा समावेश आहे.
२. ट्रान्सफर प्राइसिंग प्रकरणांमध्ये ITR दाखल करण्याची अंतिम तारीख
अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
तपशील: ज्या करदात्यांना ट्रान्सफर प्राइसिंग ऑडिट करणं अनिवार्य आहे, त्यांना मूल्यांकन वर्ष २०२५-२६ (आर्थिक वर्ष २०२४-२५) साठी आपला आयकर रिटर्न (ITR) ३० नोव्हेंबरपर्यंत दाखल करावा लागतो.
३. फॉर्म 3CEAA जमा करणे
अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
तपशील: आंतरराष्ट्रीय समूहांच्या कॉन्स्टिटुएंट एंटिटीजना आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी फॉर्म 3CEAA (जो मास्टर फाइलिंगशी संबंधित आहे) अनिवार्यपणे याच तारखेपर्यंत जमा करणं आवश्यक आहे. एकंदरीत, सर्व करदात्यांनी, विशेषत: ज्यांना ट्रान्सफर प्राइसिंग ऑडिटची आवश्यकता आहे, त्यांनी ३० नोव्हेंबर २०२५ च्या या महत्त्वपूर्ण वेळेच्या मर्यादा लक्षात ठेवाव्या जेणेकरून कोणत्याही दंडात्मक कारवाईपासून ते वाचू शकतील.
४. PNB KYC अपडेटची डेडलाइन
अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
तपशील: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत आपले केवायसी (KYC) अपडेट पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. ज्या खात्यांचे केवायसी रिन्यूअल ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत होणार होतं, त्या सर्व खात्यांना ही आवश्यकता लागू होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुसार, नियमांचं पालन न केल्यास खात्याच्या कामकाजावर निर्बंध लागू होऊ शकतो, असं बँकेनं स्पष्ट केलं आहे.
५. NPS-UPS स्विच करण्याची डेडलाइन
अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
तपशील: पात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस (NPS) मधून यूपीएस (UPS) मध्ये स्विच करण्याची डेडलाइन देखील ३० नोव्हेंबर २०२५ आहे. वेगवेगळ्या स्टेकहोल्डर्सकडून विनंत्या प्राप्त झाल्यानंतर, केंद्रानं ३० जून आणि ३० सप्टेंबरच्या मागील कट-ऑफ नंतर दुसऱ्यांदा ही डेडलाइन वाढवली आहे. यूपीएसमध्ये अलीकडे केलेल्या सुधारणांमुळे, ज्यात उत्तम फायदे आणि कर लाभ समाविष्ट आहेत, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पर्यायांचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता.
६. लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची शेवटची तारीख
अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
तपशील: जर तुम्ही निवृत्तीवेतनधारक (Pensioner) असाल, तर ३० नोव्हेंबर ही तुमचे वार्षिक लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करण्याची शेवटची तारीख आहे. ही डेडलाइन चुकल्यास तुमचं पेन्शन काही काळासाठी थांबेल, परंतु लाईफ सर्टिफिकेट जमा केल्यानंतर ते पुन्हा सुरू होईल आणि प्रलंबित पेमेंट जारी केले जातील.
