Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई

ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई

Bharat Taxi App Launch: ओला आणि उबर सारख्या बड्या कंपन्यांना तगडी फाईट देण्यासाठी १ जानेवारी २०२६ पासून 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) हे नवीन ॲप लाँच होणार आहे. पाहा अधिक डिटेल्स.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:21 IST2025-12-17T15:21:22+5:302025-12-17T15:21:22+5:30

Bharat Taxi App Launch: ओला आणि उबर सारख्या बड्या कंपन्यांना तगडी फाईट देण्यासाठी १ जानेवारी २०२६ पासून 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) हे नवीन ॲप लाँच होणार आहे. पाहा अधिक डिटेल्स.

Competing with Ola Uber Bharat Taxi app to be launched from January 1 Cheaper travel for passengers and more earnings for drivers | ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई

ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई

Bharat Taxi App Launch: ओला आणि उबर सारख्या बड्या कंपन्यांना तगडी फाईट देण्यासाठी १ जानेवारी २०२६ पासून 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) हे नवीन ॲप लाँच होणार आहे. सहकारी मॉडेलवर आधारित असलेले हे ॲप प्रवासी आणि ड्रायव्हर्स या दोघांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. प्रवाशांना 'पीक आवर्स'मध्ये वाढीव भाड्यापासून दिलासा मिळणार आहे, तर ड्रायव्हर्सना एकूण भाड्याचा ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला हे ॲप दिल्लीत लाँच केलं जाणार आहे.

सहकारी मॉडेलवर आधारित व्यवस्था

भारत टॅक्सी ॲप हे 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड'द्वारे चालवले जाईल. हे मॉडेल दिल्लीच्या टॅक्सी क्षेत्रात मोठे बदल घडवून आणेल आणि जिथे ड्रायव्हर व प्रवासी या दोघांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असा दावा केला जात आहे. या ॲपद्वारे कारसोबतच ऑटो आणि बाईक सेवा देखील पुरवली जाणार आहे. दिल्लीत या ॲपची चाचणी पूर्ण झाली असून आतापर्यंत सुमारे ५६ हजार ड्रायव्हर्सनी आपली नोंदणी केली आहे. दिल्लीनंतर गुजरातच्या राजकोटमध्येही याची चाचणी सुरू असून तिथे १ फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश

ड्रायव्हर्सचा मोठा फायदा

भारत टॅक्सी ॲपचे मॉडेल 'ड्रायव्हर-ओन्ड को-ऑपरेटिव्ह सिस्टम'वर आधारित आहे. सध्या ओला-उबरमध्ये ड्रायव्हर्सना भाड्याचा ७० टक्के भाग मिळतो, मात्र या नवीन ॲपमुळे त्यांना जास्त पैसे मिळतील आणि त्यांचं उत्पन्न वाढेल. यामुळे ड्रायव्हर्सना खासगी कंपन्यांवर अवलंबून राहण्याऐवजी एक स्वतंत्र आणि फायदेशीर पर्याय उपलब्ध होणार आहे.

प्रवाशांची सुरक्षा आणि स्वस्त भाडं

प्रवाशांसाठी या ॲपचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'पीक आवर्स'मध्ये होणाऱ्या अनियंत्रित भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणं हे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्यानं अनेक सेफ्टी फीचर्स या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. एकूणच, दिल्लीतील प्रवाशांना सुरक्षित आणि रास्त दरात प्रवास करण्याची संधी १ जानेवारीपासून मिळणार आहे. टप्प्याटप्प्यानं हे अॅप देशभरात लाँच केलं जाईल.

Web Title : भारत टैक्सी ऐप ओला, उबर को देगा चुनौती, कम किराया!

Web Summary : भारत टैक्सी ऐप 1 जनवरी, 2026 को लॉन्च होगा, जो सस्ता किराया और ड्राइवरों को अधिक कमाई देगा। सहकारी मॉडल पर आधारित, ड्राइवरों को किराए का 80% मिलेगा। दिल्ली में लॉन्च होकर, यह किफायती, सुरक्षित परिवहन देगा।

Web Title : Bharat Taxi App to Challenge Ola, Uber with Fair Fares

Web Summary : Bharat Taxi app launches January 1st, 2026, offering cheaper rides and higher driver earnings. Based on a cooperative model, drivers get 80% of fares. Initially launching in Delhi, it aims to provide affordable, safe transport with controlled peak hour pricing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.