Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता मिळणार Coca-Cola चहा, लवकरच बाजारात मिळणार ऑर्गेनिक टी

आता मिळणार Coca-Cola चहा, लवकरच बाजारात मिळणार ऑर्गेनिक टी

Coca-Cola Honest Tea: कंपनीने ऑनेस्ट टी नावाने या सेगमेंटमध्ये उतरण्याची तयारी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 17:26 IST2023-11-23T17:26:02+5:302023-11-23T17:26:12+5:30

Coca-Cola Honest Tea: कंपनीने ऑनेस्ट टी नावाने या सेगमेंटमध्ये उतरण्याची तयारी केली आहे.

Coca-Cola Honest Tea: Coca-Cola tea now available, organic tea soon available | आता मिळणार Coca-Cola चहा, लवकरच बाजारात मिळणार ऑर्गेनिक टी

आता मिळणार Coca-Cola चहा, लवकरच बाजारात मिळणार ऑर्गेनिक टी

Coca-Cola Honest Tea: Coca-Cola चे नाव ऐकताच डोळ्यासमोर कोल्ड्रिंकचे चित्र येते, पण आता कोका-कोला चहाही बनवणार आहे. यासाठी साखर किंवा दुधाची गरज नसेल. कंपनीने 'ऑनेस्ट टी' नावाने रेडी टू ड्रींक चहा लॉन्च केला. कोका-कोला इंडियाने बुधवारी 'ऑनेस्ट टी' लॉन्च करून या सेगमेंटमध्ये प्रवेशाची घोषणा केली. हा ब्रँड कोका-कोलाची उपकंपनी असलेल्या ऑनेस्टच्या मालकीचा आहे.

कोलकातातून ऑरगॅनिक ग्रीन टी येईल
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑनेस्ट टीसाठी ऑरगॅनिक ग्रीन टी कोलकातास्थित लक्ष्मी टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या मकाईबारी टी इस्टेटमधून मिळणार आहे. बंगाल ग्लोबल बिझनेस समिट (BGBS) च्या सातव्या आवृत्तीत दोन्ही कंपन्यांमध्ये या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

लिंबू-तुळस आणि आंबा फ्लेवर्स
कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ग्राहकांना अधिक व्यापक पेय पर्याय उपलब्ध करून देणे ही या यामागील कल्पना होती. आइस्ड ग्रीन टी लिंबू-तुळस आणि आंब्याच्या फ्लेवर्समध्ये येईल.

Web Title: Coca-Cola Honest Tea: Coca-Cola tea now available, organic tea soon available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.