End of Season Sale : २०२५ हे वर्ष संपण्यास आता काही दिवस उरले आहेत. वर्षाची अखेर आणि ख्रिसमसचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी देशातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांनी सवलतींचा पाऊस पाडला आहे. अॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टसह अनेक प्लॅटफॉर्मवर सध्या 'एन्ड ऑफ सीझन सेल' सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशनपर्यंत आणि स्वयंपाकघरातील उपकरणांपासून ते किराणा सामानापर्यंत सर्वच श्रेणींमध्ये भरघोस सवलती मिळत असल्याने ग्राहकांसाठी ही मोठी संधी चालून आली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्सवर सवलतींची लयलूट
- स्मार्टवॉच : 'नॉईज' सारख्या ब्रँड्सच्या स्मार्टवॉचवर चक्क ८० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत आहे.
- किचन अप्लायन्सेस : हॅवेल्स, क्रॉम्प्टन यांसारख्या कंपन्यांचे एअर फ्रायर आणि इतर उपकरणांवर ५० ते ७० टक्क्यांची सूट दिली जात आहे.
- स्मार्टफोन : रिअलमी आणि वनप्लसच्या निवडक मॉडेल्सवर ४० टक्क्यांपर्यंत मोठी बचत करण्याची संधी आहे.
फॅशन आणि लाइफस्टाइलमध्ये मोठी सूट
- बॅग आणि लगेज : 'स्कायबॅग्स'च्या बॅगांवर ८० टक्क्यांपर्यंत सूट आहे.
- फूटवेअर : 'न्यू बॅलन्स'च्या शूजवर ७० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत आहे.
- ब्रँडेड फॅशन : लाइफस्टाइल आणि शॉपर्स स्टॉपवरील आघाडीच्या ब्रँड्सवर ६० टक्क्यांपर्यंत दर कमी करण्यात आले आहेत.
खाद्यपदार्थ आणि किराणा मालावरही 'बचत'
केवळ चैनीच्या वस्तूच नव्हे, तर दैनंदिन गरजांवरही सवलती उपलब्ध आहेत. पिझ्झा हटच्या ऑर्डरवर थेट १२५ रुपयांची सूट मिळत असून, जिओमार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर किराणा मालावर ७४ टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट दिला जात आहे.
वाचा - H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
अधिक बचतीसाठी 'स्मार्ट' टिप्स
- बँक ऑफर्स : एचडीएफसी किंवा एचएसबीसी सारख्या बँकांच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ३,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक मिळू शकतो.
- फ्लॅश सेल्स : 'डिल्स मॅग्नेट' किंवा 'इंडिया डिझायर' सारख्या वेबसाईट्सवर अचानक येणाऱ्या स्वस्त डील्सवर लक्ष ठेवा.
- कॅशबॅक एग्रीगेटर्स : जास्तीत जास्त सवलतीसाठी 'देसीडाईम' किंवा 'कूपनदुनिया' यांसारखे प्लॅटफॉर्म मोठा कॅशबॅक देत आहेत.
