Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?

चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?

China Donkey Population : चीनमध्ये गाढवांच्या जीवावर चालणारा ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय सध्या संकटात सापडला आहे. देशातील गाढवांची संख्या कमालीची घटना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:03 IST2025-06-27T11:45:36+5:302025-06-27T12:03:40+5:30

China Donkey Population : चीनमध्ये गाढवांच्या जीवावर चालणारा ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय सध्या संकटात सापडला आहे. देशातील गाढवांची संख्या कमालीची घटना आहे.

China's Donkey Population Plummets 76% Due to Rising Demand for Ejiao | चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?

चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?

China Donkey Population : जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश चीन आजकाल एका अनोख्या पण चिंताजनक कारणामुळे चर्चेत आहे. हे कारण म्हणजे गाढवांचा मोठा व्यापार. चीनमध्ये गाढवाच्या कातडीपासून 'एजियाओ' नावाचे एक पारंपरिक औषध बनवण्याचा सुमारे ६.८ अब्ज डॉलर (सुमारे ५८,००० कोटी रुपये) चा उद्योग आहे. मात्र, सध्या हा उद्योग मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे चीन आता आफ्रिकेसह आशियातील काही देशांकडे मदत मागत आहे.

काय आहे प्रकरण?
'एजियाओ' हे गाढवाच्या कातडीपासून बनवलेले एक प्रकारचे जिलेटिन आहे. चीनी पारंपरिक औषधांमध्ये याचा उपयोग महिलांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि वार्धक्य रोखण्यासाठी होतो, असे मानले जाते. या औषधाच्या मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे गाढवांची बेकायदेशीर तस्करी आणि हत्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे गेल्या दोन दशकांत चीनमध्ये गाढवांची संख्या तब्बल ७६ टक्क्यांनी कमी झाली आहे.

चीनमध्ये गाढवे कमी झाल्यामुळे आता ते आफ्रिका आणि आशियातील इतर देशांमधून गाढवे आयात करत आहेत. याचा थेट परिणाम त्या देशांमधील ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे, कारण गाढवे शेती आणि मालाच्या वाहतुकीसाठी तेथील लोकांसाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत.

प्राणी संघटनांचा विरोध
गाढवांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या प्राणी संघटनांनी या व्यापारावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, गाढवांना अत्यंत क्रूरपणे हाताळले जाते, त्यांची अमानुषपणे हत्या केली जाते आणि लांबच्या प्रवासात त्यांना पुरेसे पाणी किंवा अन्न दिले जात नाही. या क्रूर व्यापाराला आळा घालण्यासाठी भारतासह अनेक देशांनी गाढवांच्या निर्यात आणि हत्येचे नियम कडक केले आहेत. अनेक आफ्रिकन देशांनीही कायदे करून हा व्यापार थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचा - नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?

तज्ज्ञांच्या मते, जर ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काही वर्षांत गाढवांचा समावेश दुर्मिळ प्रजातींमध्ये होऊ शकतो. त्यामुळे 'एजियाओ'वर पर्यायी उपाय शोधण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केले जात आहे.
 

 

Web Title: China's Donkey Population Plummets 76% Due to Rising Demand for Ejiao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.