हाँगकाँग : चीनचीअर्थव्यवस्था जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक आधारावर फक्त ४.८ टक्क्यांनी वाढली आहे. ही गेल्या एक वर्षाच्या कालावधीतील सर्वांत मंद वाढ ठरली आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापार तणावामुळे आणि देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेची गती कमी झाली आहे.
चीन सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, जुलै-सप्टेंबरचे आकडे २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीनंतरची सर्वात मंद वाढ दर्शवतात. त्याआधीच्या तिमाहीत वाढीचा दर ५.२ टक्के होता. या वर्षाच्या जानेवारी ते सप्टेंबर कालावधीत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था सरासरी ५.२ टक्क्यांच्या वार्षिक दराने वाढली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर उच्च शुल्क लावले असले तरी, चीनचे निर्यात क्षेत्र तुलनेने मजबूत राहिले आहे, कारण कंपन्या इतर देशांमध्ये विक्री वाढवण्यावर भर देत आहेत.