बीजिंग : संपूर्ण जगाला विविध प्रकारच्या वस्तू पुरवणाऱ्या चीनची व्यापारी शिल्लक (ट्रेड सरप्लस) १ लाख कोटी डॉलरवर पोहोचली आहे. या काळातील महागाईचे समायोजन केल्यानंतरही चीनची व्यापारी शिल्लक जर्मनी, जपान आणि अमेरिका यांसारख्या देशांपेक्षाही अधिक आहे.
वस्तू उत्पादन क्षेत्रातील प्रगतीमुळे हा पल्ला गाठणे चीनला शक्य झाले. वस्तू उत्पादन क्षेत्रात चीनने एकाधिकारशाही निर्माण केली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका अशाच स्थितीला पोहोचला होता. चीनच्या एकाधिकारशाहीविरुद्ध जगातील अनेक देश आता आवाज उठवू लागले असून, चिनी वस्तूंवर कर लावण्यात येत आहेत. अशा देशांवर चीननेही कर लावून प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जगभरात व्यापार युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे.