Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?

चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानचा मित्र म्हणवत असलेल्या चीननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:23 IST2025-05-07T13:13:06+5:302025-05-07T13:23:17+5:30

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानचा मित्र म्हणवत असलेल्या चीननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे

China imposes 166 percent tariff on India announcement amid Pak tension impact on these sectors | चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?

चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानचा मित्र म्हणवत असलेल्या चीननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कृषी आणि कीटकनाशकांशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स बुधवारी व्यवहारादरम्यान चर्चेत होते. इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेडच्या शेअर्सपासून ते अॅग्रीटेक, यूपीएल, शारदा क्रॉपकेमच्या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

शेअर्समधील या हालचालीमागे चीनकडून करण्यात आलेली घोषणा कारणीभूत आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं भारतातून आयात होणाऱ्या सायपरमेथ्रिनवर पाच वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी ४८.६% वरून १६६.२% पर्यंत लागू करणार असल्याचं म्हटलं आहे. एका तपासानंतर हे पाऊल उचलल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यामध्ये देशांतर्गत उद्योगाचं मोठं नुकसान झालं आहे आणि याला डम्पिंग आणि मटेरिअल यांच्यात कारणीभूत संबंध असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय.

पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

काय आहे सायपरमेथ्रिन?

सायपरमेथ्रिन हे एक कीटकनाशक आहे जे कृषी आणि स्वच्छता क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. कापूस, भाजीपाला, मका, फुलं यासह विविध पिकांवरील किड नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो. भारतातून या उत्पादनाच्या आयातीच्या नकारात्मक परिणामापासून साखर उत्पादकांचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं हे शुल्क लावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने (एमओएफकॉम) दिलेल्या माहितीनुसार, ते बुधवारपासून भारतातून आयात होणाऱ्या सायपरमेथ्रिनवर अँटी डम्पिंग ड्युटी लागू करणार आहेत.

हे शेअर्स फोकसमध्ये

अॅग्रीटेकचा शेअर आज घसरला असून तो १४९.५९ रुपयांवर व्यवहार करत आहे. कृषी कंपनी कावेरी सीड कंपनी लिमिटेडचा शेअर आज २ टक्क्यांनी घसरून १,४०८.१० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर पीआय इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर आज १ टक्क्यांनी घसरून ३,६२४.७० रुपयांवर आला. त्याचबरोबर इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेडचे शेअर्स चर्चेत आहेत. कंपनीचा शेअर आज २ टक्क्यांहून अधिक वधारला असून तो १४२.५२ रुपयांवर व्यवहार करत आहे. 

याशिवाय इंसेक्टिसाइड्स (इंडिया) शेअर किरकोळ तेजीत असून तो ६७९ रुपयांवर व्यवहार करत आहे. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडचा शेअरही आज किरकोळ वधारला असून तो ७७९.७० रुपयांवर व्यवहार करतोय. याशिवाय भारत रसायन, पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड, बायर क्रॉपसायन्स लिमिटेड, धानुका यूपीएल, शारदा क्रॉपकेम सह संबंधित कंपन्यांचे शेअर्स चर्चेत आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: China imposes 166 percent tariff on India announcement amid Pak tension impact on these sectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.