नवी दिल्ली : एआय टूल ‘चॅटजीपीटी’ अल्पावधीत कमालीचे लोकप्रिय झाले आहे. विशेष म्हणजे ‘चॅटजीपीटी’ युजर्स अमेरिकेपेक्षा भारतात वेगाने वाढत आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये जगभरात चॅटजीपीटीचे युजर्स ५ कोटी इतके होते. ही संख्या आता एप्रिल २०२५ मध्ये ८० कोटींपर्यंत पोहोचली आहे. ‘चॅटजीपीटी’नंतर ‘डीपसीक’ जगभरात लोकप्रिय आहे. ‘डीपसीक’च्या युजर्सच्या बाबतीत भारतच अव्वल स्थानी आहे.
५ दिवसांत १० लाख युजर्स
फोर्ड कार, आयफोन आदी उत्पादनांना १० लाखांचा टप्पा गाठण्यासाठी अनेक दिवस संघर्ष करावा लागला होता. ‘चॅटजीपीटी’ने हा टप्पा अवघ्या ५ दिवसांत गाठला आहे.
‘चॅटजीपीटी’चे आठवड्याचे युजर्स किती?
- ऑक्टोबर २०२२ - ५ कोटी
- ऑक्टोबर २०२३ - १० कोटी
- ऑक्टोबर २०२४ - २५ कोटी
- एप्रिल २०२५ - ८० कोटी