- उमेश शर्मा
(चार्टर्ड अकाउंटंट)
अर्जुन : कृष्णा, जीएसटी विभागाने १६ जानेवारी २०२५ रोजी अनेक नवीन सूचना जारी केल्या आहेत. काय आहेत या सूचना?
कृष्ण : १. नवीन अधिसूचना क्रमांक ०१/२०२५ द्वारे ‘फोर्टिफाइड राइस कर्नल’वर जीएसटी दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.
२. अधिसूचना क्रमांक ०४/२०२५ द्वारे जुन्या आणि वापरलेल्या वाहनांच्या विक्रीवर जीएसटी दर १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू सप्लायरच्या नफ्यावर आधारित ठरवले जाईल. नोंदणीकृत डीलर्स जर डेप्रिसिएशन क्लेम करत असतील, तर जीएसटी विक्री किंमत आणि डेप्रिसिएशन वजा झालेल्या किमतीच्या नफ्याच्या फरकावर लागू होईल.
३. अधिसूचना क्रमांक ०५/२०२५ द्वारे ‘स्पेसिफाइड प्रिमायसेस’ची व्याख्या बदलण्यात आली आहे.
स्पेसिफाइड प्रिमायसेसची व्याख्या :
(अ) ज्या प्रिमायसेसमध्ये सप्लायरने मागील आर्थिक वर्षात ₹७,५०० प्रतियुनिट प्रतिदिन दराने हॉटेल निवास सेवा दिली.
(ब) ज्या नोंदणीकृत व्यक्तीने मागील आर्थिक वर्षाच्या १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत ‘स्पेसिफाइड’म्हणून Annexure VII मध्ये डिक्लेरेशन फाईल केले.
(क) नवीन नोंदणीकृत व्यक्तीने नोंदणीचे ॲक्नॉलेजमेंट मिळाल्यानंतर १५ दिवसांत स्पेसिफाइड म्हणून Annexure VIII मध्ये डिक्लेरेशन फाईल केले.
५. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम : नवीन अधिसूचना क्रमांक ०७/२०२५ द्वारे पुढील बदल केले आहेत :
(अ) आता फक्त बॉडी कॉर्पोरेट व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे दिल्या गेलेल्या स्पॉन्सरशिप सेवांवर आरसीएम लागू होईल.
(ब) अनरजिस्टर्ड व्यक्तीने इममुव्हेबल प्रॉपर्टी रजिस्टर्ड व्यक्तीला भाड्याने दिली असेल, तर आरसीएम लागू होईल.
करनीती: १६ जानेवारीपासून जीएसटीत झालेले बदल..
GST Update: जीएसटी विभागाने १६ जानेवारी २०२५ रोजी अनेक नवीन सूचना जारी केल्या आहेत. काय आहेत या सूचना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 09:32 IST2025-01-20T09:00:21+5:302025-01-20T09:32:01+5:30
GST Update: जीएसटी विभागाने १६ जानेवारी २०२५ रोजी अनेक नवीन सूचना जारी केल्या आहेत. काय आहेत या सूचना?
