कोलकाता : पंतप्रधान पीकविमा योजनेत बदल करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे या योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या पीकविम्याच्या हप्त्यात बदल होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. सुधारित पीकविमा योजना ‘पीएमएफबीवाय २.०’ या नावाने ओळखली जाऊ लागली आहे. विमा घेणे शेतक-यास ऐच्छिक करण्याचा महत्त्वाचा बदल नव्या योजनेत आहे.
फेब्रुवारी, २०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पीकविमा योजना घोषित केली होती. पीककर्ज घेणा-या शेतकऱ्यांना पीकविमा घेणे यात बंधनकारक आहे. सध्या देशातील ५८ टक्के शेतकरी कर्जदार आहेत. सक्तीमुळे हे सर्व शेतकरी पीकविमाधारक आहेत. ‘अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया’चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मलय कुमार पोद्दार यांनी सांगितले की, विस्तृत मार्गदर्शक सूचनांची आम्हाला प्रतीक्षा आहे.
पीकविमा हप्त्यात होणार बदल, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान पीकविमा योजनेत बदल करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे या योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या पीकविम्याच्या हप्त्यात बदल होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:13 IST2020-03-03T05:13:24+5:302020-03-03T05:13:33+5:30
पंतप्रधान पीकविमा योजनेत बदल करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे या योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या पीकविम्याच्या हप्त्यात बदल होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
