Lokmat Money > बिझनेस न्यूज > गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ

गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ

Government employee : केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि केरळमधील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ऑगस्ट महिन्याचे वेतन आणि पेन्शन गणपती आणि ओणम सणांपूर्वी जारी केले जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:30 IST2025-08-26T14:42:45+5:302025-08-26T15:30:20+5:30

Government employee : केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि केरळमधील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ऑगस्ट महिन्याचे वेतन आणि पेन्शन गणपती आणि ओणम सणांपूर्वी जारी केले जाईल.

Central Government Employees in Maharashtra, Kerala to Get Advance Salary for Festivals | गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ

गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ

Government employee :केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि केरळमध्ये काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. गणेश चतुर्थी आणि ओणमसारख्या मोठ्या सणांपूर्वीच त्यांच्या ऑगस्ट महिन्याचे वेतन आणि पेन्शन खात्यात जमा केले जाणार आहे. या निर्णयामुळे कर्मचारी कोणत्याही आर्थिक चिंतेशिवाय आपल्या कुटुंबासोबत सण उत्साहात साजरे करू शकतील.

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी आजच वेतन
अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज, २६ ऑगस्ट २०२५ रोजी ऑगस्ट महिन्याचा पगार आगाऊ दिला जाईल. यामध्ये संरक्षण, पोस्ट आणि टेलिकॉम विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यावर्षी गणेश चतुर्थी २७ ऑगस्टला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी पगार एक दिवस आधीच दिला जात आहे.

केरळमध्येही सणापूर्वीच मदत
केरळमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही सरकारने सणाआधीच वेतन आणि पेन्शन दिली आहे. २५ ऑगस्ट २०२५ रोजी ओणम सणापूर्वीच त्यांच्या ऑगस्ट महिन्याची सैलरी खात्यात जमा करण्यात आली आहे.

नंतर केली जाईल ॲडजस्टमेंट
सरकारने स्पष्ट केले आहे की, हे वेतन आणि पेन्शन आगाऊ दिले जात आहे. महिना संपल्यानंतर याचा हिशोब केला जाईल आणि गरज पडल्यास रकमेची ॲडजस्टमेंट केली जाईल. सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) वेळेवर पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

वाचा - दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार

या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. यामुळे त्यांच्या सणांचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

Web Title: Central Government Employees in Maharashtra, Kerala to Get Advance Salary for Festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.