Aadhaar Card Mobile No Update: आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या कामात आधार कार्डचा वापर केला जातो. यामध्ये तिकीट बुकिंगपासून हॉटेल बुकिंगपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय अनेक गोष्टींच्या पडताळणीसाठीही आधार कार्डचा वापर केला जातो. आधार कार्डमध्ये अनेक महत्त्वाची माहिती असते. यामध्ये जन्मतारखेपासून ते मोबाइल क्रमांकापर्यंतचा समावेश आहे. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील काही माहिती बदलायची असेल तर तुम्ही ती ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून बदलू शकता.
आज आम्ही तुम्हाला आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदलण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत. आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर खूप महत्वाचा आहे. अशावेळी तुमचा नवीन मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. अनेकदा आधार कार्ड व्हेरिफिकेशनसाठी ओटीपीची मदत घेतली जाते, जो केवळ नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येतो. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये नवीन मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर त्यासाठी अपॉइंटमेंट शेड्यूल करावी लागेल आणि तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जावं लागेल.
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलायचा?
- आधार कार्डमधील मोबाइल क्रमांक बदलण्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन भाषा निवडा.
- आता My Aadhaar, Get Aadhaar आणि नंतर Book an Appointment च्या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर आपलं लोकेशन निवडा आणि Proceed to Book Appointment पर्यायावर क्लिक करा.
- आपला मोबाइल नंबर एन्टर करा आणि CAPTCHA कोड आणि ओटीपीच्या मदतीने पुढे जा.
- आता मागितलेली सर्व माहिती भरा आणि आपलं जवळचं आधार सेवा केंद्र देखील निवडा.
- Update Mobile Number पर्यायावर क्लिक करा आणि आपल्या सोयीनुसार अपॉईंटमेंटसाठी तारीख आणि वेळ निवडा.
- सबमिटवर क्लिक करा आणि अपॉइंटमेंट फायनल करा.
अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर तुम्हाला वेळेनुसार आधार सेवा केंद्रात जावे लागेल. तिथे अधिकारी तुमची पडताळणी करतील आणि तुमचा मोबाईल नंबरही अपडेट करतील.