BSNL News Recharge Plan: बीएसएनएलनं या दिवाळीला आपल्या नवीन ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने ‘दिवाळी बोनान्झा योजना’ सुरू केली आहे, ज्या अंतर्गत फक्त १ रुपयात पूर्ण एका महिन्याची मोफत 4G सेवा दिली जाईल. यामध्ये कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सर्व काही मोफत असेल.
भारताची सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलनं सांगितलं की, ही ऑफर १५ ऑक्टोबर २०२५ पासून १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील. जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्या नवीन 4G नेटवर्कचा अनुभव घ्यावा, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
या दिवाळी ऑफरमध्ये काय मिळणार?
या योजनेत ग्राहकांना अनेक फायदे मिळत आहेत. हा प्लान सक्रिय करण्यासाठी कोणतंही वेगळं शुल्क भरावं लागणार नाही. फक्त १ रुपयाची टोकन रक्कम आणि केवायसी (KYC) पूर्ण करावी लागेल. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना फक्त जवळच्या बीएस्एनएल ग्राहक सेवा केंद्रात जावं लागेल. तिथे या स्टेप्स फॉलो करा:
- केवायसी कागदपत्रांसह (KYC Document) सीएसईला भेट द्या.
- Diwali Bonanza Planची विनंती करा.
- केवायसी पूर्ण करा आणि मोफत सिम घ्या.
- सिम घाला आणि अॅक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
- यानंतर ३० दिवसांची मोफत सेवा आपोआप सुरू होईल.
यामध्ये ग्राहकांना ३० दिवसांची वैधता मिळेल. तसंच यात अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळेल. याशिवाय यात दररोज २ जीबी डेटाचा लाभ मिळेल. तर दिवसाला १०० एसएमएसही मिळतील. हे सिम अगदी मोफत मिळणार असून यात केवळ १ रुपया टोकन अॅक्टिव्हेशन चार्ज म्हणून द्यावा लागेल. आवश्यकता वाटल्यास ग्राहक १८००-१८०-१५०३ वर कॉल करू शकतात किंवा bsnl.co.in वेबसाइटला भेट देऊ शकतात.
‘मेक इन इंडिया’ नेटवर्कवर पूर्ण विश्वास
बीएस्एनएलचे सीएमडी ए. रॉबर्ट जे. रवी यांनी सांगितलं की, कंपनीनं देशभरात नवीन 4G नेटवर्क स्थापित केलं आहे, जे पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ तंत्रज्ञानानं बनलेलं आहे. ही ऑफर लोकांना या नेटवर्कची गुणवत्ता आणि कव्हरेजचा अनुभव घेण्याची संधी देई“बीएस्एनएलचा उद्देश केवळ स्वस्त सेवा देणे नाही, तर भारतातील प्रत्येक नागरिकाला आत्मनिर्भर डिजिटल नेटवर्कशी जोडणं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.