BSNL Recharge plan: भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ही भारताची एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. BSNL लोकांमध्ये आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. इतर खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत BSNL आपल्या युजर्सना अत्यंत स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करते, ज्यामुळे हे प्लॅन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतात.
१ वर्षाच्या व्हॅलिडिटीचा नवा प्लॅन
BSNL नं आपल्या युजर्ससाठी एक असा रिचार्ज प्लॅन आणला आहे, जो पूर्ण १ वर्षाच्या व्हॅलिडिटीसह येतो. हा प्लॅन एकदा खरेदी केल्यानंतर युजर्सना पूर्ण वर्षभर पुन्हा रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. १ वर्षाच्या व्हॅलिडिटीसह या प्लॅनमध्ये युजर्सना परवडणाऱ्या किमतीत अमर्यादित फायदे मिळणार आहेत. आपण BSNL च्या २७९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगत आहोत.
२० वर्षांनंतर किती असेल १ लाख रुपयांचं मूल्य, समजून घ्या महागाईचं संपूर्ण गणित
BSNL चा २७९९ रुपयांचा प्लॅन
BSNL चा २७९९ रुपयांचा हा प्लॅन पूर्ण १ वर्ष म्हणजेच ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. यासोबतच दररोज ३GB हाय-स्पीड डेटा आणि रोज १०० मोफत SMS ची सुविधा देखील मिळते.
BSNL कडे १ वर्षाचा आणखी एक पर्याय
जर तुमचं बजेट थोडं कमी असेल, तर BSNL कडे २३९९ रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे. हा प्लॅन सुद्धा ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात युजर्सना अमर्यादित फ्री कॉलिंग, दररोज २GB डेटा आणि रोज १०० मोफत SMS मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज मिळणारा डेटा थोडा कमी मिळेल.
BSNL नेटवर्कचा विस्तार
BSNL आपल्या नेटवर्कच्या विस्तारावर अत्यंत वेगानं काम करत आहे. कंपनीनं अलीकडेच अनेक शहरांमध्ये आपली 4G सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे युजर्सना जलद इंटरनेटचा लाभ मिळत आहे. याशिवाय, कंपनी आता 5G नेटवर्कवरही काम करत असून लवकरच BSNL युजर्सना 5G सेवेचा लाभ घेता येईल.
