Lokmat Money > बिझनेस न्यूज > टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?

टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?

Tiger Shroff Property: पाहा कुठे होती त्याची ही लक्झरी प्रॉपर्टी आणि किती कोटींना त्यानं ही खरेदी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 10:22 IST2025-09-09T10:21:32+5:302025-09-09T10:22:41+5:30

Tiger Shroff Property: पाहा कुठे होती त्याची ही लक्झरी प्रॉपर्टी आणि किती कोटींना त्यानं ही खरेदी केली होती.

bollywood action actor Tiger Shroff sold a luxury apartment in Mumbai for rs 15 60 crore see details How much was the property purchased for | टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?

टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?

Tiger Shroff Property: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफनं त्याचं मुंबईतील खार परिसरातील एक अपार्टमेंट ₹१५.६० कोटीमध्ये विकलं. ही माहिती इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनच्या (आयजीआर) अधिकृत रेकॉर्डकडून मिळाली आहे. ऑनलाइन प्रॉपर्टी पोर्टल squareyards.com यासंदर्भातील माहिती दिलीये. हा करार सप्टेंबर २०२५ करण्यात आलाय. खार हे मुंबईच्या सर्वात स्थापित आणि उच्च-मूल्याच्या रिअल इस्टेट मार्केटपैकी एक मानलं जाते.

ही प्रॉपर्टी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि आगामी मेट्रो लाइनमधून चांगलीच जोडलेली आहे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), लोअर परेल आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासूनही नजीक आहे.

शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी

अपार्टमेंटची साईज किती?

इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनच्या मालमत्ता नोंदणी दस्तऐवजांनुसार, टायगर श्रॉफनं विकलेलं अपार्टमेंट रुस्तमजी पॅरामाउंटमध्ये आहे. या अपार्टमेंटचे कार्पेट क्षेत्र १,९८९.७२ चौरस फूट (सुमारे १८४.८५ चौरस मीटर) आहे आणि बिल्ट अप एरिया २,१८९ चौरस फूट (सुमारे २०३.३४ चौरस मीटर) आहे. या करारामध्ये तीन कार पार्किंगच्या जागांचा समावेश आहे. या करारासाठी ९३.६० लाख रुपयांची स्टँप ड्युटी आणि ३० हजार रुपयांचं रजिस्ट्रेशन शुल्क भरण्यात आलंय. स्क्वेअर यार्ड्सच्या माहितीनुसार, टायगर श्रॉफनं ही मालमत्ता २०१८ मध्ये ११.६२ कोटींना विकत घेतली होती.

टायगर श्रॉफ हा एक सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे जो अॅक्शन स्टार म्हणूनही ओळखला जातो. तो सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. टायगरनं २०१४ मध्ये हिरोपंती या चित्रपटासह अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांव्यतिरिक्त, त्यानं फिटनेस आणि प्रेरणादायक जीवनशैलीद्वारे एक मजबूत चाहता वर्ग तयार केलाय.

Web Title: bollywood action actor Tiger Shroff sold a luxury apartment in Mumbai for rs 15 60 crore see details How much was the property purchased for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.