Lokmat Money > बिझनेस न्यूज > एआयमुळे पुढील ५ वर्षांत २ लाख नोकऱ्यांवर गदा, ३% कपातीचा ब्लुमबर्ग इंटेलिजन्सचा इशारा

एआयमुळे पुढील ५ वर्षांत २ लाख नोकऱ्यांवर गदा, ३% कपातीचा ब्लुमबर्ग इंटेलिजन्सचा इशारा

बीआयचे वरिष्ठ संशोधक तथा अहवालाचे लेख तोमाज नोएटजेल यांनी सांगितले की, बँक ऑफिस, मिडल ऑफिस आणि ऑपरेशन्स यांसारख्या विभागातील नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:34 IST2025-01-14T12:33:52+5:302025-01-14T12:34:15+5:30

बीआयचे वरिष्ठ संशोधक तथा अहवालाचे लेख तोमाज नोएटजेल यांनी सांगितले की, बँक ऑफिस, मिडल ऑफिस आणि ऑपरेशन्स यांसारख्या विभागातील नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल. 

Bloomberg Intelligence warns of 2 lakh jobs lost, 3% cut in next 5 years due to AI | एआयमुळे पुढील ५ वर्षांत २ लाख नोकऱ्यांवर गदा, ३% कपातीचा ब्लुमबर्ग इंटेलिजन्सचा इशारा

एआयमुळे पुढील ५ वर्षांत २ लाख नोकऱ्यांवर गदा, ३% कपातीचा ब्लुमबर्ग इंटेलिजन्सचा इशारा

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावामुळे आगामी ३ ते ५ वर्षांत जागतिक बँकिंग क्षेत्रातील दोन लाख नोकऱ्या संपतील, असा इशारा ब्लुमबर्ग इंटेलिजन्सने दिला आहे. ‘एआय’मुळे कर्मचारी संख्येत सरासरी ३ टक्के कपात होईल, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
बीआयचे वरिष्ठ संशोधक तथा अहवालाचे लेख तोमाज नोएटजेल यांनी सांगितले की, बँक ऑफिस, मिडल ऑफिस आणि ऑपरेशन्स यांसारख्या विभागातील नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल. 

कोणत्या कामांचा ताबा घेणार?
नोएटजेल यांनी सांगितले की, नियमित आणि पुनरावृत्तीच्या कामांचा ताबा ‘एआय’वर चालणाऱ्या यंत्रणा घेऊ शकतात. वास्तविक ‘एआय’मुळे नोकऱ्या पूर्णत: संपणार नाहीत. मात्र, श्रमशक्तीत बदल घडू होईल. ही प्रगती बँकिंग क्षेत्रातील सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात सहायक ठरू शकेल. 

Web Title: Bloomberg Intelligence warns of 2 lakh jobs lost, 3% cut in next 5 years due to AI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.