Black Friday Sale 2025: अमेझॉन, फ्लिपकार्ट, विजय सेल्स आणि क्रोमा सारख्या लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट्सवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू आहे. या सेल दरम्यान, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि टीव्ही आणि रेफ्रिजरेटर सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ६५% पर्यंत सूट देण्यात येतेय. याव्यतिरिक्त, कार्ड ऑफर, बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरसारखे फायदे देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे किंमती आणखी कमी होतात.
अमेझॉन ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये बंपर डिस्काउंट
अमेझॉनचा ब्लॅक फ्रायडे सेल २८ नोव्हेंबरपासून सुरू झाला आणि १ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. स्मार्ट टीव्ही आणि रेफ्रिजरेटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट दिली जात आहे. कंपनीने ३२-इंच ते ६५-इंच पर्यंतच्या स्मार्ट टीव्हीवर ५५-६५% च्या किमतीत सूट दिली आहे.
फ्लिपकार्टचा ब्लॅक फ्रायडे सेल २३ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून तो २८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. तर क्रोमाचा ब्लॅक फ्रायडे सेल २२ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून ऑफर ३० नोव्हेंबरपर्यंत व्हॅलिड आहे.
रतन टाटांच्या मृत्युपत्रात सातासमुद्रापलीकडील व्हिला; खरेदीसाठी कोण इच्छुक? पैसे कोणाला मिळणार?
कोणती साइटवर जास्त सूट?
लहान टीव्ही (३२-४३ इंच): Amazon VW आणि Acer वर ६४-६७% पर्यंत सूट मिळत आहे, तर Flipkart च्या Foxsky च्या टीव्हीवर ६७% सूट मिळत आहे. याशिवाय बँक ऑफर्सचाजेखील लाभ घेता येईल.
मोठे टीव्ही (५०+ इंच): फ्लिपकार्ट Toshiba (५५-इंच, ५५% सूट) आणि रियलमी (५०-इंच, ५५% सूट) वर चांगली डील देते, तर अमॅझोन TCL ५५-इंच वर ६२% सूट देते, परंतु MRP जास्त आहे.
फ्रिजवरील डिस्काऊंट
लहान फ्रिजवरील ऑफर्स (Small Refrigerators)
२०० लिटरच्या आसपास क्षमता असलेल्या फ्रिजवर खालीलप्रमाणे सवलती मिळत आहेत:
फ्लिपकार्टवर: Haier आणि CANDY ब्रँडच्या फ्रिजवर ३५ ते ३६% पर्यंत सूट उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास फ्रिजची किंमत १०,००० रुपयांपेक्षा कमी होऊ शकते.
अमेझॉनवर: Whirlpool १९२ लिटरच्या फ्रिजवर २६% सूट मिळत आहे. मात्र, बँक ऑफरसह अंतिम किंमत १४,८६५ रुपये इतकी आहे.
मोठ्या फ्रिजवरील ऑफर्स (Large Refrigerators)
३०० लिटर किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या फ्रिजवर मोठ्या ऑफर्स दिसून येत आहेत:
Realme ५८४ लिटरच्या फ्रिजवर तब्बल ५३% ची सूट असून तो ४१,९९० रुपयांना उपलब्ध आहे. तसxच, BOSCH च्या फ्रिजवर ४१% सूट आहे. कुटुंबाच्या आकारानुसार मोठी क्षमता असलेले फ्रिज घेण्याचा विचार असल्यास तुम्ही दोन्ही ठिकाणच्या किमतींची तुलना करुन पाहू शकता.
अमेझॉनवर: येथे Samsung (२३६ लिटर, ३८% सूट) किंवा LG (४४६ लिटर, २७% सूट) सारखे ब्रँडेड पर्याय चांगले आहेत, परंतु त्यांची सूट फ्लिपकार्टच्या तुलनेत कमी आहे.
बँक ऑफरद्वारे अतिरिक्त सवलत
या सेलमध्ये बँक कार्ड्सद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना त्वरित सूट मिळू शकते.
अमेझॉन (Amazon): ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये एक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी बँक च्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १०% इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय, आयसीआयसीआय अमेझॉन पे क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास ५% डिस्काउंट आणि ५% कॅशबॅक उपलब्ध आहे.
फ्लिपकार्ट (Flipkart): ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये एचएसबीसी आणि बँक ऑफ बडोदाच्या कार्डने पेमेंट केल्यास १०% इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे.
