Bitcoin Price Today: बुधवारी बिटकॉइननं एक नवीन विक्रम प्रस्थापित केला, जो अमेरिकन शेअर बाजाराच्या तेजीशी सुसंगत असल्याचं दिसून येतंय. बुधवारी संध्याकाळी अमेरिकन वेळेनुसार बिटकॉइनची किंमत १,२३,५०० डॉलर्सच्या वर गेली, जी १४ जुलै रोजी गाठलेल्या १,२३,२०५.१२ डॉलर्सच्या मागील उच्चांकी पातळीपेक्षा जास्त आहे. या तेजीनंतर S&P ५०० नं सलग दुसऱ्या सत्रात त्याची विक्रमी पातळी गाठली.
गेल्या एका वर्षात बिटकॉइनच्या किमतीत सातत्यानं वाढ होण्याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रुची. ज्यांनी त्यासाठी उदारमतवादी कायदेविषयक वातावरणही तयार केलंय. मायकेल सायलर यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांनी बिटकॉइनची मागणी वाढवली आहे कारण ते ही क्रिप्टोकरन्सी साठवण्याची रणनीती स्वीकारत आहेत. या ट्रेंडमुळे इथरसारख्या इतर क्रिप्टोकरन्सींनाही चालना मिळालीये.
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
तेजीची ३ प्रमुख कारणं
१. स्पष्ट कायदेशीर वातावरण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने क्रिप्टोसाठी अनुकूल धोरणं आखली.
२. कंपन्यांचा रस: मायकेल सायलर सारख्या नेत्यांच्या कंपन्या बिटकॉइन खरेदी करत आहेत. आता इथर सारख्या छोट्या क्रिप्टो चलनंही या लाटेत सामील झालेत.
३. व्याजदराच्या अपेक्षा: अमेरिकेतील चलनवाढीची आकडेवारी मध्यम राहिली असून, सप्टेंबरमध्ये व्याजदरात घसरण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे गुंतवणूकदार सोने-चांदी सोडून क्रिप्टोकडे वळले.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)