Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमा असूनही बिल पेशंटच्या माथी; खासगी आरोग्य विमा कंपन्या १० लाखांचे कव्हर असेल, तरी देतात ७.५ लाख रुपये

विमा असूनही बिल पेशंटच्या माथी; खासगी आरोग्य विमा कंपन्या १० लाखांचे कव्हर असेल, तरी देतात ७.५ लाख रुपये

देशात एकूण २९ खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील आणि स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:37 IST2024-12-05T09:37:16+5:302024-12-05T09:37:42+5:30

देशात एकूण २९ खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील आणि स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्या आहेत.

Bill on patient despite insurance; Private health insurance companies pay Rs 7.5 lakh even if the cover is Rs 10 lakh | विमा असूनही बिल पेशंटच्या माथी; खासगी आरोग्य विमा कंपन्या १० लाखांचे कव्हर असेल, तरी देतात ७.५ लाख रुपये

विमा असूनही बिल पेशंटच्या माथी; खासगी आरोग्य विमा कंपन्या १० लाखांचे कव्हर असेल, तरी देतात ७.५ लाख रुपये

मुंबई : कोणतीही व्यक्ती विश्वासाने नामांकित कंपनीकडून आरोग्य विमा काढण्यास प्राध्यान्य देत असते. २०२२-२३ या आर्थिक वर्षात बहुतांश खासगी विमा कंपन्यांनी विमाधारकांना दावा केलेली पूर्ण रक्कम दिलेलीच नाही. दावा केलेल्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम कंपन्यांनी दिली असून, उर्वरित २५ टक्के पैसे विमाधारकांना भरावे लागले आहेत. इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या अहवालातून हे चित्र समोर आले आहे. देशात एकूण २९ खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील आणि स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्या आहेत.

खासगी विमा कंपन्यांपैकी एचडीएफसी अर्गो या कंपनीने दावा केलेल्या रकमेपैकी ७१.३५ टक्के रक्कम दिली आहे. आयसीआयसीआय लोबार्डने ६३.९८ टक्के रक्कम दिली, तर सर्वात कमी रक्कम रिलायन्स जनरल या कंपनीने दिली आहे.

आयबीएआयचा अहवाल काय सांगतो?

२.३६ कोटी इतके एकूण आरोग्य विमा दावे २०२२-२३ या आर्थिक वर्षात दाखल करण्यात आले.

७५% दावे टीपीएमार्फत पूर्ण करण्यात आले तर २५ टक्के दावे अंतर्गत यंत्रणेकडून पूर्ण करण्यात आले.

५६% दाव्यांची पूर्तता कॅशलेशने केली, तर ४२ टक्के दाव्यांत खर्चाची प्रतिपूर्ती (रिइम्बर्समेंट) केली आहे.

०४ इतक्याच कंपन्यांनी २०२३ मध्ये दावा केलेल्या रकमेपैकी ९० टक्केपेक्षा अधिक रक्कम विमाधारकाला दिली आहे.

१० खासगी आरोग्य विमा कंपन्यांनी दावा केलेल्या रकमेपैकी ८० टक्के रक्कम विमाधारकाला दिली आहे.

सरकारी कंपन्या आघाडीवर

दावा केलेल्या रकमेपैकी सर्वाधिक रक्कम देण्यात न्यू इंडिया ॲश्युरन्स ही सरकारी कंपनी आघाडीवर आहे. कंपनीने ९८.७४ टक्के रक्कम दिली आहे. यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया यांचा क्रमांक लागतो.

विमाधारकांना दाव्याचे किती पैसे दिले?

      

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या

न्यू इंडिया      ९५.०४   ९८.७४  

ओरिएंटल इन्शुरन्स      ८७.९७   ९७.३५  

नॅशनल इन्शुरन्स        ८४.६१   ८७.९५  

युनायटेड इंडिया ८४.२८   ७३.०३  

खासगी क्षेत्रातील कंपन्या

इफ्फको टोकियो ९१.७०   ८०.४४  

बजाज आलियांझ ९०.२९   ८६.२३  

एबीआय जनरल ८८.८६   ८६.३०  

गो डिजिट      ९७.३०   ७९.५०  

एचडीएफसी अर्गो ८६.९०   ७१.३५  

फ्युचर जनराली ८२.८३   ७४.३२  

आयसीआयसीआय लोम्बार्ड        ८२.५९   ६३.९८  

टाटा एआयजी   ७५.५६   ७४.६५

चोला एमएस    ६९.५३   ६८.१८  

रिलायन्स जनरल        ५८.०६   ७१.०७  

आरोग्य विमा क्षेत्रातील स्वतंत्र कंपन्या

आदित्य बिर्ला हेल्थ      ९४.५२   ७१.५६  

निवा बुपा       ८८.५७   ६७.७६  

मणीपाल सिग्ना ८८.४८   ५६.१४  

केअर हेल्थ      ८८.०६   ६७.५५  

स्टार हेल्थ      ७५.१०   ५४.६१  

(स्रोत : इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया )

 

Web Title: Bill on patient despite insurance; Private health insurance companies pay Rs 7.5 lakh even if the cover is Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.