lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगातील सर्वांत मोठ्या विमानाचे उड्डाण, हवेतूनच अग्निबाण सोडण्याचे उद्दिष्ट

जगातील सर्वांत मोठ्या विमानाचे उड्डाण, हवेतूनच अग्निबाण सोडण्याचे उद्दिष्ट

अमेरिकेतील एका खासगी कंपनीने तयार केलेल्या जगातील आजवरच्या सर्वात मोठ्या विमानाने शनिवारी कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंटावरून प्रथमच दोन तासांचे यशस्वी उड्डाण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 07:18 AM2019-04-15T07:18:14+5:302019-04-15T07:18:28+5:30

अमेरिकेतील एका खासगी कंपनीने तयार केलेल्या जगातील आजवरच्या सर्वात मोठ्या विमानाने शनिवारी कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंटावरून प्रथमच दोन तासांचे यशस्वी उड्डाण केले.

The biggest airplane flights in the world, avoiding firefighting in the air | जगातील सर्वांत मोठ्या विमानाचे उड्डाण, हवेतूनच अग्निबाण सोडण्याचे उद्दिष्ट

जगातील सर्वांत मोठ्या विमानाचे उड्डाण, हवेतूनच अग्निबाण सोडण्याचे उद्दिष्ट

वॉशिंग्टन : उपग्रह प्रक्षेपक अग्निबाण जमिनीवरील अंतराळ तळाऐवजी थेट आकाशातूनच खूप उंचीवरून सोडण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून अमेरिकेतील एका खासगी कंपनीने तयार केलेल्या जगातील आजवरच्या सर्वात मोठ्या विमानाने शनिवारी कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंटावरून प्रथमच दोन तासांचे यशस्वी उड्डाण केले. अंतराळ विज्ञानास नवी दिशा देणारे पहिले पाऊल म्हणून हा प्रयोग ऐतिहासिक मानला जात आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एक अब्जाधीश संस्थापक पॉल अ‍ॅलन यांनी गेल्या वर्षी दुर्धर आजाराने निधन होण्यापूर्वी खास ही मोहीम डोळ््यापुढे ठेवून स्थापन केलेल्या ‘स्ट्रॅटोलॉन्च’ या कंपनीच्या अजस्त्र आकाराचे हे विमान यशस्वीपणे हवेत उडाले याच्याएवढेच ते पुन्हा सुखरूपपणे जमिनीवर उतरले हेही लक्षणीय आहे.
पंखांच्या पसाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठ्या अशा या विमानाने माजावे हवाई व अंतराळ तळावरून उड्डाण केले. दोन तासांच्या फेरफटक्यात या विमानाने ताशी ३०४ किमी एवढा कमाल वेग व १७ हजार फुटांची उंची गाठली. एकाला एक जोडलेल्या दोन विमानांनासारखे दिसणारे हे विमान कोणतीही अडचण न येता पुन्हा सुखरूपपपणे उतरले तेव्हा हे आश्चर्य पाहण्यासाठी हजर असलेल्या काही शे प्रक्षकांनी आनंदाने जल्लोश केला.
स्ट्रॅॅटोलॉन्चचे मुख्य कार्याकारी अधिकारी जीन फ्लॉईड म्हणाले की, एवढे अवाढव्य आकाराचे हे विमान आकाशात झेपावताना पाहणे हा माझ्यासाठी मोठा भावनीक क्षण होता.
पूर्वी अमेरिकी हवाईदलात एफ-१६ लढाऊ विमाने चालविलेल्या इव्हान थॉमस या कसबी वैमानिकाने या अनोख्या उड्डाणाचे सारथ्य केले. थॉमस म्हणाले की, एकूणच हा अनुभव चमत्कृतीपूर्ण होता. विमान पूर्णपणे नव्या धाटणीचे होते तरी त्याचे हे पहिले उड्डाण बव्हंशी आमच्या अपेक्षेनुसार झाले.
पंखांच्या खाली तयार केलेल्या खास कप्प्यांमध्ये एका वेळी उपग्रहधारी तीन अग्निबाण वाहून नेता येतील, अशी या विमानाची रचना आहे. विमान पृथ्वीपासून ३५ हजार फूट उंचीपर्यंत वर गेले की पंखांखालचे अग्निबाण प्रज्ज्वलित करायचे व त्या अग्निबाणांनी सोबतचा उपग्रह अंतराळात इच्छित स्थळी नेऊन सोडायचा, अशी या मागची कल्पना आहे. पृथ्वीवर ठराविक ठिकाणच्या प्रक्षेपण तळावरून उपग्रहवाही अग्निबाण सोडण्याऐवजी ते खूप उंचीवरून हवेतूनच सोडण्याची ही संकल्पित पद्धत कमी खर्चाची आहे. यात अग्निबाणाच्या इंधनाची तर बचत होईलच. शिवाय ऐनवेळी खराब हवामानामुळे अग्निबाणाचे प्रक्षेपण रद्द करावे लागण्याने येणाºया अडचणीही याने दूर होतील. (वृत्तसंस्था)


शिवाय ही योदना यशस्वी झाली तर उपग्रह प्रक्षेपणासाठी वेगळे प्रक्षेपण तळ असण्याची गरज उरणार नाही. नेहमीचे विमानतळ वापरूनही हे काम करणे शक्य होईल.
पंखांच्या पसाºयाच्या दृष्टीने हे जगातील सर्वात मोठे विमान आहे. याआधीचे असे सर्वात रुंद पंखांचे विमान दुसºया महायुद्धात वापरले गेलेले आठ इंजिनांचे ‘एच-४ हर्क्युलस’ हे होते. ‘स्प्रुस गूस’ या टोपण नावाने ओेळखल्या गेलेल्या या विमानाच्या पंखांचा पसारा ३२० फूट होता, पण त्याची लांबी जेमतेम २१९ फूट होती. आज ते विमान संग्रहलायात पाहायला मिळते. लांबीच्या दृष्टीने विचार केला तर आताच्या स्ट्रॅटोलॉन्च’च्या विमानाहूनही विमाने याआधी होऊन गेली आहेत. त्यात २७५.५ फूट लांबीचे, सहा इंजिनांच्या, ‘अ‍ॅन्तोनोव्ह एएन २२५’ मालवाहू विमानाचा व २५० फूट लांबीच्या ‘बोर्इंग ७४७-८’ हे प्रवासी वाहतुकीच्या विमानाचा समावेश होतो.
>असे आहे हे अगडबंब विमान
पंखांचा पसारा फूटबॉलच्या मैदानाहूनही मोठा-११७ मीटर.
बोर्इंग ७४७ विमानाची सहा इंजिन.
वजन पाच लाख पौंड
१.३ दशलक्ष पौंड वजन वाहून नेण्याची क्षमता.
चाकांच्या सहा जोड्या.
नेहमीच्या विमानांप्रमाणे अ‍ॅल्युमिनियमऐवजी कार्बन फायबरची बांधणी.
या चाकांमधील अंतर खूप जास्त असल्याने दोन धावपट्ट्यांची गरज.

Web Title: The biggest airplane flights in the world, avoiding firefighting in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.