मुंबई : कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या हजारो छोट्या व्यवसायांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठे रिलिफ पॅकेज घोषित केले. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील कंपन्या व संस्थांना २५ कोटींपर्यंतची कर्ज सवलत यात मिळेल. तणावात असलेले तथापि, अद्याप कुकर्ज घोषित न झालेले कर्ज यात पुनर्रचित केले जाईल.
रिझर्व्ह बँकेने मंगळवारी यासंबंधीचे परिपत्रक सर्व बँका व बिगर बँक वित्तीय संस्थांना पाठविले. जीडीपी, निर्यात, औद्योगिक उत्पादन व रोजगार निर्मिती यात एमएसएमई क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे, पण हे क्षेत्र सध्या संकटात आहे. त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे आहे, असे बँकेने म्हटले आहे.
सूत्रांनी सांगितले की, नोटाबंदी व जीएसटीचा सर्वाधिक फटका एमएसएमई क्षेत्राला बसला. आयएल अँड एफएस दिवाळखोरीत निघाल्यानंतर बिगर वित्तीय संस्थांचा निधी आटला. परिणामी, एमएसएमई क्षेत्राचा भांडवल पुरवठा थांबला आहे.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या योजनेनुसार, कर्ज पुनर्रचना कार्यक्रम ३१ मार्च, २0२0 पर्यंत राबविला जाईल. पुनर्रचनेसाठी बँकांना किमान ५ टक्के निधीची तरतूद करावी लागेल. सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना या योजनेसाठी निश्चित धोरण ठरवावे लागेल.
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शक्तिकांत दास यांनी सरकारला दिलेला हा दुसरा दिलासा आहे. राखीव निधीतून सरकारला किती रक्कम देता येऊ शकेल, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी नुकतीच एक समिती स्थापन केली आहे. (वृत्तसंस्था)
संकटात सापडलेल्या एमएसएमई कंपन्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठे रिलिफ पॅकेज
कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या हजारो छोट्या व्यवसायांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठे रिलिफ पॅकेज घोषित केले. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील कंपन्या व संस्थांना २५ कोटींपर्यंतची कर्ज सवलत यात मिळेल.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 01:17 IST2019-01-03T01:17:44+5:302019-01-03T01:17:56+5:30
कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या हजारो छोट्या व्यवसायांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठे रिलिफ पॅकेज घोषित केले. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील कंपन्या व संस्थांना २५ कोटींपर्यंतची कर्ज सवलत यात मिळेल.
