Gold Silver Price 18 July: आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. आज दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव पुन्हा एकदा वधारलेत. शुक्रवारी, १८ जुलै रोजी सराफा बाजारात चांदीच्या किमतीत १३०० रुपयांची वाढ झाली आहे. तर, सोन्यात ३७५ रुपयांची वाढ झाली. जीएसटीसह २४ कॅरेट सोनं १,००,७६२ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे, तर चांदी १,१५,६६९ रुपये प्रति किलोनं विकली जातेय. गुरुवारी चांदीचा भाव प्रति किलो १,११,००० रुपये आणि सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९७,४५३ रुपयांवर बंद झाला होता. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,८२८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदीचा भाव प्रति किलो १,१२,३०० रुपयांवर उघडला.
जुलैमध्ये सोने किती महागलं?
जुलैमध्ये चांदीमधील तेजी सोन्यापेक्षा खूपच जास्त होती. या काळात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १९४२ रुपयांनी वाढला, तर चांदीचा भाव ५४९० रुपयांनी वाढला. आयबीजेए दरानुसार, ३० जून रोजी सोनं प्रति १० ग्रॅम ९५,८८६ रुपयांवर बंद झालं. तर, चांदी १०५५१० रुपये प्रति किलो दरानं विकली गेली. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही.
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्यात. तुमच्या शहरात यामुळे १००० ते २००० रुपयांचा फरक पडण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरी संध्याकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
१८ ते २३ कॅरेटचे दर काय?
आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनं देखील ३७५ रुपयांनी महागलं आणि ते ९७,४३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीमुळे त्याची किंमत आता १,००,३५९ रुपये झाली. मेकिंग चार्जेसचा यात समावेश नाही. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,६१० रुपये आहे. जीएसटीसह ते ९२२९८ रुपये झालंय. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव २८१ रुपयांनी वाढून ७३,३७१ रुपये झाला आहे आणि जीएसटीसह तो ७५,५७२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.