नवी दिल्ली: सणासुदीच्या सेल नंतर आता ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी फ्लिपकार्टने आपल्या पुढील मेगा सेलची घोषणा केली आहे. कंपनीने 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५'ची तारीख जाहीर केली आहे, ज्यामुळे खरेदीदारांना इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट्सवर भरघोस सवलती मिळवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटवर या सेलसाठी एक समर्पित 'मायक्रोसाइट' देखील लाईव्ह करण्यात आली आहे, ज्याची टॅगलाईन 'Bag The Biggest Deals' अशी आहे.
सेलची तारीख आणि प्रमुख ऑफर्स
फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५'ची सुरुवात २३ नोव्हेंबर पासून होणार आहे. या सेलमध्ये विविध श्रेणीतील उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट अपेक्षित आहे. नुकताच फेस्टीव्ह सीझन सेल येऊन गेला आहे. यामुळे याची देखील तुलना केली जाणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्सवर सवलत
स्मार्टफोन, स्मार्टवॉच, होम एंटरटेनमेंट सिस्टीम, टीव्ही, लॅपटॉप, पीसी, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठी सूट मिळेल. गॅझेट्स व्यतिरिक्त, कपडे, दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि होम डेकोर आयटम्सवरही किमती कमी होतील. हिवाळ्यासाठी आवश्यक असलेले रूम हीटर्स आणि गीझर सारखे इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स देखील डिस्काउंटवर मिळण्याची शक्यता आहे.
बँक ऑफर्स
फ्लिपकार्टने अद्याप क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिस्काउंटसाठी भागीदार बँकांची नावे जाहीर केलेली नाहीत. फ्लिपकार्टने सेलची तारीख जाहीर केल्यानंतर, त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी अमेझॉन (Amazon) देखील लवकरच त्यांच्या 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५'ची घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे.
