Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत

जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत

Jio Vs Vi Recharge : आज आम्ही तुम्हाला Jio आणि VI च्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:02 IST2025-08-31T15:59:53+5:302025-08-31T16:02:06+5:30

Jio Vs Vi Recharge : आज आम्ही तुम्हाला Jio आणि VI च्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो.

Best 2.5GB Daily Data Plan Find Out if Jio or Vi is the Winner | जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत

जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत

Jio Vs Vi Recharge : रिचार्ज प्लॅन निवडताना कमी किमतीत जास्तीत जास्त फायदे मिळावेत अशी प्रत्येक ग्राहकाची इच्छा असते. रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया या दोन्ही टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षक प्लॅन देत आहेत. जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून, वीआय तिसऱ्या क्रमांकावर आहे. अलीकडेच, वीआयने आपली 5G सेवा देखील सुरू केली आहे.

आज आपण जिओ आणि वीआयच्या दररोज २.५GB डेटा देणाऱ्या सर्वात स्वस्त प्लॅनची तुलना करणार आहोत. चला पाहूया, कमी किमतीत कोणता प्लॅन अधिक चांगला आहे.

जिओचा २.५GB डेली डेटा प्लॅन
जिओचा दररोज २.५GB डेटा देणारा सर्वात स्वस्त प्लॅन तुम्ही ३९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला खालील फायदे मिळतील.

  • वैधता : २८ दिवस
  • डेटा: दररोज २.५GB
  • कॉलिंग: अनलिमिटेड फ्री कॉलिंग
  • एसएमएस: दररोज १०० फ्री एसएमएस
  • अतिरिक्त फायदे : जिओ टीव्ही, जिओ एआय क्लाऊड आणि ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचा लाभ.

वीआयचा २.५GB डेली डेटा प्लॅन
वीआयचा दररोज २.५GB डेटा देणारा सर्वात स्वस्त प्लॅन ४६९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला हे फायदे मिळतात.

  • वैधता : २८ दिवस
  • डेटा: दररोज २.५GB
  • कॉलिंग: अनलिमिटेड फ्री कॉलिंग
  • एसएमएस: दररोज १०० फ्री एसएमएस
  • अतिरिक्त फायदे : वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट, आणि १२ तासांसाठी अनलिमिटेड फ्री डेटाचा लाभ. या प्लॅनमध्येही ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचा लाभ दिला जातो.

वाचा - पैसे तयार ठेवा! टाटा कॅपिटलचा IPO लवकरच! शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व तपशील

कोणता प्लॅन चांगला?
किमतीनुसार पाहिल्यास, जिओचा ३९९ रुपयांचा प्लॅन वीआयच्या ४६९ रुपयांच्या प्लॅनपेक्षा जास्त स्वस्त आहे. दोन्ही प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे सारखेच आहेत. मात्र, जिओ अतिरिक्त अॅप्स आणि हॉटस्टारचा लाभ देतो, तर वीआय वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड डेटाचे विशेष फायदे देतो. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही योग्य प्लॅन निवडू शकता.

Web Title: Best 2.5GB Daily Data Plan Find Out if Jio or Vi is the Winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.