नवी दिल्ली : देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी सोमवारी ‘हंड्रेड मिलियन जॉब्स’ नामक राष्ट्रीय मोहीम घोषित केली. याअंतर्गत आगामी दशकात १० कोटी रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत.
देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असली, तरी पुरेशा नोकऱ्या निर्माण न होत नसल्यामुळे या मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. या मोहिमेची घोषणा नॅसकॉमचे सहसंस्थापक हरीश मेहता, जागतिक उद्योजक संघटना ‘टीआयई’चे संस्थापक ए. जे. पटेल आणि सेंटर फॉर इनोव्हेशन इन पब्लिक पॉलिसीचे संस्थापक के. यतीश राजावत यांनी केली.
